Thursday, September 28, 2023
Homeपुणेमावळवडेश्वर मावळ येथून अल्पवयीन मुलगी बेपत्ता, दहा दिवस उलटूनही पत्ता नाही, परिवारामध्ये...

वडेश्वर मावळ येथून अल्पवयीन मुलगी बेपत्ता, दहा दिवस उलटूनही पत्ता नाही, परिवारामध्ये भीतीचे वातावरण…

मावळ (प्रतिनिधी): मावळ तालुक्यातील शिंदे माटेवाडी , वडेश्वर येथील 15 वर्षीय अल्पवयीन मुलगी मागील 10 तारखे पासून बेपत्ता असून अजूनही तिचा धागादोरा नाही. तीचे कुटुंबीय हैराण झाले असून पोलीस प्रशासनाने आमची मुलगी आम्हास मिळवून दयावी अशी कळकळीची विनंती केली जात आहे.
मारुती तुकाराम गायकवाड (सध्या रा . लिलावती हॉस्पिटलच्या पाठीमागे, चिंचपोकळी , बांद्रा प.मुंबई, मुळ राहणार , कोंडीवडे ता. मावळ ) यांनी वडगांव पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
प्राथमिक माहिती नुसार फिर्यादी तुकाराम गायकवाड हे कामास्तव मुंबई येथे राहत आहेत. त्यांची मुलगी कु. श्रुती मारुती गायकवाड (वय 15,वर्ष) ही शिक्षणाकरिता तीची आजी इंदुबाई सोपान खांडेभरड (वय 75,रा. शिंदे घाटेवाडी, वडेश्वर,ता. मावळ) यांच्याकडे राहत असते.
फिर्यादी यांना दि.10 रोजी उशीरा रात्री 1:30 वा. च्या सुमारास त्यांच्या सासु इंदुबाई सोपान खांडेभरड यांनी मोबाईलवर फोन करून कळविले की श्रुती ही रात्री 1 वा. च्या सुमारास कोणासही काहीएक न सांगता घरातुन निघुन गेली आहे , तु लवकर ये असे कळविले ते मुंबई वरून तात्काळ त्यांचा भाऊ प्रकाश तुकाराम गायकवाड याच्या सोबत सासुच्या घरी आले. त्याच बरोबर सर्व नातेवाईकांच्या साहाय्याने कोंडीवडे येथिल नातेवाईकांकडे शोध घेतला इतर नातेवाईकाकडे फोनव्दारे विचारपूस केली परंतु तीचा काहीएक ठावठिकाणा लागला नाही .म्हणुन तिला कोणीतरी अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणावरून फुस लावुन पळवून नेले असल्याबाबत खात्री झाल्याने त्यांनी दि.10 रोजी सकाळी 12 वा. च्या सुमारास वडगाव मावळ पोलिस स्टेशन कडे धाव घेतली.व तक्रार नोंद केली.

परंतु आज दहा दिवस उलटूनही मुलीचा अद्याप शोध लागला नसुन माझ्या मुलीचे काही बरेवाईट तर झाले नाही ना असा संशय येत आहे. वडील व फिर्यादी मारुती गायकवाड यांनी व्यक्त केले.
बेपत्ता मुलीचे वर्णन खालीलप्रमाणे नाव- श्रृती मारुती गायकवाड ( वय.15, वर्षे 25 दिवस , शिक्षण 10 वी पास,अंगाने सडपातळ , रंग गोरा, उंची 4 फुट , केस काळे वाढलेले , चेहरा गोल , नाक सरळ,डोळे काहे , नेसणीस लाल रंगाचा टॉप व काळ्या रंगाची लेगिन्स,पायात चप्पल, भाषा मराठी बोलते, तीच्याकडे काळ्या रंगाची सॅक आहे.
वरील वर्णनाची अल्पवयीन मुलगी कुणास आढळली तर तिच्या नातेवाईकांशी संपर्क साधावा. नाव – प्रकाश गायकवाड मो. क्र.7039602788.अन्यथा वडगांव मावळ पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा.
- Advertisment -