![]()
if(isset($image4)); {?>
![]()
} ?>
if(isset($image5)); {?>
![]()
} ?>
अंबावणे (प्रतिनिधी): वनविभाग पूणे तरफे वनपरीक्षक कार्यालय पौड व वनसंरक्षन समिती माजगाव यांच्या मार्फत शिक्षणासाठी काळाची गरज लक्षात घेत माजगाव येथील जि.प. शाळेला शालेय ऊपयोगास येणारे व्हाईट बोर्ड, ब्लॅक बोर्ड, वह्या, पुस्तके, पेन, पॅड, चित्रकला साहित्य व ऑफिस उपयुक्त असे अनेक साहित्य वाटप करण्यात आले.
यावेळी ग्रामपंचायत अंबावणेचे विद्यमान सरपंच मच्छिन्द्र कराळे, अंबावणे वनपाल एस. बी. अहिराव, अंबावणे वनरक्षक योगेश जाधव, माजगाव वनसमिती आध्यक्ष गुरूदास भारतराव मेने, स्थानिक ग्रामस्थ किसन दाभाडे, नथू खोंडगे, दत्ता पांगसे, यशवंत माताळे, मारुती तोंडे, नंदू मेने, खंडू गावडसे आदी मान्यवरांसह शालेय मुख्याध्यापक, शिक्षक व विध्यार्थी मोठया प्रमाणात उपस्थित होते.
या वेळी शाळेच्या लहान विध्यार्थ्यांनी सांस्कृती कार्यक्रम व नृत्य कला सादर करून उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. सरोज साखरे व मारुती सूर्यवंशी सर तसेच अंगणवाडी शिक्षिका सारिका वाळंज यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले.
त्याचबरोबर सरपंच मच्छिन्द्र कराळे व इतर मान्यवरांनी थोडक्यात आपले मनोगत व्यक्त करत प्रबोधन केले. तर गुरूदास भारतराव मेने यांनी वनविभागाच्या सर्व उपस्थित पदाधिकाऱ्यांचे आभार व्यक्त करत धन्यवाद दिले.