वन्यजीव रक्षकांनी वाचविले भेकराचे प्राण… प्रशंसनीय कामगिरी !

0
108

साते मावळ : वन्यजीव रक्षकांची कौतुकास्पद कामगिरी साते येथील कंपनीत अडकलेल्या भेकरास दिले जीवदान.

साते येथील सेफ एक्सप्रेस कंपनीत आज सकाळी एक भेकर घुसले होते. त्या भेकरास कंपनीतील कामगारांनी सुरक्षित डांबून ठेऊन याची माहिती वन्यजीव रक्षक टिमला दिली. माहिती मिळताच वन्यजीव रक्षक टिमचे सदस्य कंपनीत आले आणि त्या भेकरास सुरक्षितपणे ताब्यात घेऊन त्याची तळेगाव येथील पशुवैद्यकीय रुग्णालयात नेऊन तपासणी व प्राथमिक उपचार करून त्यास साते येथील वनक्षेत्रात सुरक्षितपणे सोडण्यात आले.

सदर कौतुकास्पद कामगिरी वन्यजीव रक्षक टीमचे अध्यक्ष अनिल आंद्रे , सदस्य जिगर सोळंकी , निनाद काकडे , दक्ष काटकर , सचिन वाडेकर व वनविभागाचे वनरक्षक संदीप जांभूळकर , आशा शेळके , मोहिनी शिरसाट आणि शिवाजी बुंदे यांनी केली आहे.