वरसोली टोल नाका येथील मनमानी कारभारावर मावळ तालुका मनसे ची धडक…

0
207

वरसोली : वरसोली टोल नाका येथील कर्मचाऱ्यांच्या मनमानी कारभाराच्या विरोधात टोल व्यवस्थापनाची मावळ तालुका मनसे च्या वतीने कान उघडणी.

गेल्या अनेक दिवसांपासून मावळच्या नागरिकांकडून वरसोली टोल नाका संबंधित विविध तक्रारी प्राप्त होत होत्या.वारंवार स्थानिकांकडून बळजबरी टोल वसुली करणे,अरेरावी करणे, वाहतूक कोंडीची समस्या निर्माण करणे तसेच इतर गोष्टीं बाबत मनसे मावळ तालुका अध्यक्ष रुपेशभाऊ म्हाळसकर यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र नवनिर्माण सेना मावळ तालुक्याच्या वतीने वरसोली टोल नाक्यावर धडक देत व्यवस्थापनाला जाब विचारण्यात आला तसेच कडक इशारा देत पुन्हा असे गैरप्रकार टोल नाक्यावर होणार नाही याची हमी व्यवस्थापनाकडून घेण्यात आली.

यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेना पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.