वरसोली टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांची अरेरावी थांबवा ,शिव सेनेची मागणी !

0
74

वरसोली मावळ : वरसोली टोलनाक्यावरील कर्मचाऱ्यांकडून स्थानिकांना होणारी अरेरावी त्वरित थांबवावी , स्थानिकांना टोलमधून सवलत असताना देखील टोलनाक्यावरील कर्मचारी अडवणूक करतात , हुज्जत घालतात , अरेरावी करतात , भांडण करत त्रास देतात , हे सर्व प्रकार वारंवार घडत असल्याने ते त्वरित थांबवावेत अन्यथा तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा मावळ तालुका शिवसेनेच्या वतीने टोलनाका व्यवस्थापनाला निवेदनाद्वारे देण्यात आला.

लोणावळा , खंडाळा व कार्ला परिसरात पर्यटन मोठ्या प्रमाणात असल्यामुळे शनिवारी रविवारी नित्यानेच टोलनाक्यावर 2 ते 3 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागतात . अशा वेळी स्थानिकांना वेगळी लेन असावी व प्रवास करणाऱ्या वाहन चालकांसाठी टोलनाक्यावर सुलभ शौचालय नाही , यामुळे भौतिक सोयीसुविधा पुरवण्याची मागणी देखील निवेदनाद्वारे करण्यात आली . यावेळी मावळ तालुका शिवसेना प्रमुख राजेश खांडभोर , लोणावळा शहर प्रमुख बाळासाहेब फाटक , मावळ युवासेना प्रमुख विजय तिकोणे , मा . उपजिल्हा प्रमुख भारत ठाकूर , उप तालुका प्रमुख अशिष ठोंबरे , अनिल ओव्हाळ , दत्ता केदारी , संतोष गिरी , मंगेश येवले शिवसैनिक उपस्थित होते.