वलवण समतानगर दलित वस्तीच्या रस्ता डांबरीकरणाचे काम लवकरात लवकर प्रशासनाने पूर्ण करून द्यावे…

0
28

लोणावळा : वलवण समता नगर ते वलवण नांगरगाव रस्त्याला जोडणाऱ्या भूमिपूजन झालेल्या रस्त्याच्या कामाला काही स्थानिकांचा विरोध असल्यामुळे स्थगित रस्त्याचे काम ताबडतोब पूर्ण करून दलित वस्तीला न्याय मिळवून द्यावा असे निवेदन माजी उपनगराध्यक्ष दिलीप शामराव दामोदरे यांच्या वतीने लोणावळा नगरपरिषद मुख्याधिकारी यांना दिले.

वलवण विभागातील वलवण नांगरगाव मुख्य रस्ता ते रोहीदास वाडा ( समतानगर ) कडे जाणाऱ्या ब्री . पी . वरील रस्त्याचे डांबरीकरण करण्याबाबत कामाचे टेंडर होऊन सदर काम करण्याचा आदेश संबंधित ठेकेदाराला देण्यात आलेला आहे .या रस्त्याचे भूमीपूजन दि . 8/1/2022 तत्कालीन नगराध्यक्षा सुरेखाताई जाधव व उपनगराध्यक्ष दिलीप दामोदरे यांच्याहस्ते करण्यात आलेले आहे .

परंतू मागासर्वीय ( दलीत ) वस्तीत जाणाऱ्या रस्त्याला काही वलवण विभागातील लोकांनी हरकत घेतल्याने सदर रस्ता होत नसून हा दलीत समाजावर अन्याय होत आहे . तरी सदर विषयाची गंभीर दखल घेऊन योग्य ती कारवाई करुन दलीत वस्तीकडे जाणारा रस्ता पूर्ण करुन देण्यात यावा अशी विनंती दिलीप शामराव दामोदरे यांनी लोणावळा नगरपरिषदेकडे निवेदनामार्फत केली आहे.

यापूर्वी दिलीप दामोदरे यांनी लोणावळा नगरपरिषदेच्या माध्यमातून अनेक कामे पूर्ण केली आहेत आणि यापुढेही लोणावळा नगरपरिषदेचे नवनिर्वाचित मुख्याधिकारी पंडित पाटील यांनी याबाबत सहकार्य करावे अशी अपेक्षा यावेळी बोलताना दामोदरे यांनी व्यक्त केली आहे.