Sunday, December 8, 2024
Homeपुणेमावळवाकसई गावातील गणपती बाप्पांना भक्तिमय वातावरणात निरोप…

वाकसई गावातील गणपती बाप्पांना भक्तिमय वातावरणात निरोप…

लोणावळा (प्रतिनिधी): वाकसई येथील पाच दिवसीय बाप्पा व गौराई ला भक्तिमय वातावरणात वाजत गाजत निरोप देण्यात आला.
विसर्जन मिरवणूकीच्या प्रारंभी मारुती मंदिरात भजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मंदिर आवारात महिलांनी टाळ्या फुगडीचा फेर धरला. तदनंतर एक गाव एक गणपती अंतर्गत सर्व घरगुती गणपतींची मारुती मंदिर ते विसर्जन घाटा पर्यंत एकत्रित अशी डी जे वाजवत भंडारा उधळत भव्य मिरवणूक काढण्यात आली.यावेळी महिला व पुरुषांनी विविध पारंपरिक वेष भुषा परिधान करून मिरवणुकीत सहभागी झाले होते.वाकसई गावातील सर्व कार्यकर्ते पुढारी,ग्रामस्थ व महिला भगिनी या पाच दिवसीय बाप्पांच्या विसर्जन मिरवणुकीत सहभागी झाले होते.
तसेच गावा गावातून विसर्जन मिरवणूक शांततेत व उत्साहात पार पडावी यासाठी लोणावळा ग्रामीण पोलिसांचा फिरता बंदोबस्त लावण्यात आला होता. अशा पद्धतीने अगदी उत्साहात वाकसई येथील पाच दिवसीय बाप्पाचे विसर्जन इंद्रायणी नदीपात्रात करण्यात आले.
- Advertisment -

You cannot copy content of this page