Friday, June 9, 2023
Homeपुणेलोणावळावाकसई येथील दहावी बोर्ड परीक्षा विध्यार्थ्यांसाठी आमदार सुनील शेळके यांच्या माध्यमातून मोफत...

वाकसई येथील दहावी बोर्ड परीक्षा विध्यार्थ्यांसाठी आमदार सुनील शेळके यांच्या माध्यमातून मोफत वाहतूक सेवा…

लोणावळा (प्रतिनिधी):मावळचे लोकप्रिय आमदार सुनिल शेळके यांच्या माध्यमातून वाकसई, देवघर, करंडोली, जेवरेवाडी परिसरात राहणाऱ्या दहावी बोर्ड परीक्षा विध्यार्थ्यांसाठी वाहनाची व्यवस्था मोफत करून देण्यात आली आहे.
हे सर्व व्ही पी एस हायस्कूल चे इंग्रजी माध्यमातील 15 विध्यार्थी असून यांचे परीक्षा केंद्र भोंडे हायस्कूल लोणावळा असल्याने या विध्यार्थ्यांची पायपीट थांबावी,विध्यार्थ्यांना अभ्यासासाठी जास्तीत जास्त वेळ मिळावा तसेच विध्यार्थी वेळेत परीक्षा केंद्रावर पोहोचावेत या उद्देशाने आमदार सुनील शेळके मंचचे कार्यकर्ते अशोक ढाकोळ यांच्या प्रयत्नातून व आमदार सुनील (आण्णा )शेळके यांच्या माध्यमातून या वाहनाची मोफत व्यवस्था करण्यात आली आहे. दहावी बोर्ड परीक्षेच्या विध्यार्थ्यांना घरापासून ते परीक्षा केंद्रापर्यंत थेट वाहन उपलब्ध करून दिल्याबद्दल विध्यार्थी व पालकांमध्ये उत्सहाचे वातावरण असून पालकांकडून आभार मानण्यात येत आहे.
आमदार सुनील शेळके यांच्या प्रयत्नातून आणि मावळ डेव्हलपमेंट फाउंडेशनच्या माध्यमातून यंदाही सालाबादप्रमाणे मावळ तालुक्यातील इयत्ता दहावीची बोर्ड परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोफत वाहतूक सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

त्यामध्ये आंदर मावळ 47 वाहने ,नाणे मावळात 20 वाहने,पवन मावळात 38 वाहने,किन्हई मध्ये 2 वाहने तर लोणावळा येथे 3 वाहने अशा एकुण 110 गाड्या आमदार सुनिल शेळके यांच्या प्रयत्नांतून आणि मावळ डेव्हलपमेंट फाउंडेशनच्या माध्यमातून मोफत उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत.

त्यानुसार रामभाऊ परुळेकर विद्यालय,पु.वा.परांजपे विद्यामंदिर तळेगाव दाभाडे,संत तुकाराम विद्यालय देहू, सेंड ज्युड हायस्कूल, शिवाजी विद्यालय देहूरोड, न्यू इंग्लिश स्कूल वडगाव, पवना विद्यामंदिर पवनानगर, पंडित नेहरू विद्यालय कामशेत, न्यू इंग्लिश स्कूल चांदखेड, बापूसाहेब भोंडे हायस्कूल,व ऑक्सिलियम कॉन्व्हेंट हायस्कूल लोणावळा इत्यादी परीक्षा केंद्रावरील विध्यार्थ्यांसाठी वाहतूक व्यवस्था करण्यात आली आहे.

You cannot copy content of this page