वारकरी संप्रदाय निवासी आध्यत्मिक शिबिरास “जगद्गुरू संत तुकाराम ” महानाट्य समितीची भेट…

0
51

मावळ – मावळ तालुका वारकरी संप्रदाय मंडळाच्या वतीने कान्हे फाटा येथे साई सेवा धाम मध्ये निवासी बालवारकरी अध्यात्मिक शिबिर चालू असून रोज मावळ तालुक्यातील अनेक मान्यवर या शिबिरास भेट देत आहेत. त्याचबरोबर दिनांक 14 रोजी “जगद्गुरू संत तुकाराम” महानाट्य समितीने या शिबिरास भेट दिली.

मावळ तालुका वारकरी संप्रदाय मंडळाचे अध्यक्ष नंदकुमार भसे व कमिटीच्या वतीने उपस्थित मान्यवरांचा श्रीफळ ,संत तुकारम महाराज गाथा व ज्ञानेश्वरी देऊन सन्मान करण्यात आला.या वेळी मान्यवरांसमोर मुलांनी भजन व पावली दाखवत मान्यवरांना मंत्रमुग्ध केले.

यावेळी वैराग्यमूर्ती ह.भ.प. शंकरमहाराज मराठे, उद्योजक नंदकुमार वाळुंज, भरतजी येवले,जितुभाई कल्याणजी, मा.ता. दिंडी समाज अध्यक्ष तुकाराम गायकवाड, मा.सभापती राजाराम शिंदे , मा.ता. दिंडी समाज सेक्रेटरी पांडुरंग लालगुडे, देवराई संस्थानचे सुकनजी बाफना ,मा.ता. दिंडी समाज उपाध्यक्ष गणेश काजळे, शिबिराचे प्रमुख शांताराम गायखे, दत्ताजी शिंदे , उपाध्यक्ष दिलीप वावरे,बापूजी तारे, तुकाराम महानाट्याचे दिग्दर्शक अभिजीत कडू, दिघे, धोंडीबा होजगे, विभाग प्रमुख अभिमन्यू शिंदे,महादू नवघने , अशोक गरवड आदी मान्यवर उपस्थित होते