Saturday, November 2, 2024
Homeमहाराष्ट्ररायगड" विकास पुरुष आमदार महेंद्र शेठ थोरवे व्हिजन - २ च्या लागले...

” विकास पुरुष आमदार महेंद्र शेठ थोरवे व्हिजन – २ च्या लागले तयारीला “..

२९ ऑक्टोंबर ला उमेदवारी अर्ज भरताना करणार जोरदार शक्तिप्रदर्शन !

भिसेगाव – कर्जत ( सुभाष सोनावणे ) अवघ्या अडीच वर्षात आपल्या ” तल्लख बुध्दीने ” मनात आखलेल्या ” संकल्पनेतून ” २९०० कोटी रुपयांचा निधी विकास कार्यासाठी आणून कर्जत खालापूर मतदार संघात ” विकासाची गंगा ” आणून ” विकास पुरुष ” म्हणून उल्लेखनीय कार्य करणारे ” कार्यसम्राट आमदार महेंद्र शेठ थोरवे ” आपल्या दुसऱ्या पर्वास म्हणजे ” व्हिजन – २ ” च्या तयारीत असून महाराष्ट्राचे मा. लाडके ” मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब ” यांचे अत्यंत निकटवर्तीय म्हणून महाराष्ट्रात ख्याती असल्याने त्यांना शिवसेनेच्या पहिल्या यादीतच अधिकृत उमेदवारी मिळाली असून मंगळवार दिनांक २९ ऑक्टोंबर २०२४ रोजी सकाळी १० वाजता शिवतीर्थ – पोसरी येथून कार्यकर्त्यांच्या भव्य लवाजमा सहित , मोठ्या संख्येने ” शक्ती प्रदर्शन ” करत आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

गाव तिथे – विकास , झटपट निर्णय ताबडतोब काम , काम सांगा – निधी मंजूर , विकास कार्य सहज , तरुणांना रोजगार , मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अभियान अंतर्गत महिला भगिनी यांचे आर्थिक सक्षमीकरण , बचत गटांना मदत , त्यांनी केलेल्या वस्तूंना विक्री करण्यास योग्य बाजारपेठ , रस्ते – पुल यांचे जाळे तयार करून दळण वळण सुरळीत करण्याचा प्रयत्न , पर्यटनाला चालना , त्यांच्या संकल्पनेतून ऐतिहासिक वास्तूची निर्मिती करून कर्जत नगरीत सौंदर्याची भर , भजन भूषण गजानन बुवा पाटील यांचे स्मारक, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन , शिवसृष्टी , छत्रपती संभाजी महाराज स्मारक , तीर्थरूप डॉ . नानासाहेब धर्माधिकारी प्रवेशद्वार , प्रशासकीय भवन , याच पद्धतीने खालापूर तालुक्यात देखील केलेल्या विकासाच्या जोरावर जनता जनार्दन मत देवून त्यांना ” विजयाच्या शिखरावर ” नेऊन प्रचंड मतांनी निवडून देतील , अशी ” आखणी व विजयी व्यूहरचना ” शिवसैनिकांच्या जोरावर केली असल्याचे दिसून येत आहे.

सन २०१९ साली आमदार महेंद्र शेठ थोरवे यांनी शिवसेनेतून उमेदवारी लढवून १ लाख २ हजार २०८ मते मिळवली होती . त्यामुळे या ” व्हिजन – २ ” मध्ये ते मागील आपल्या मतांचा रेकॉर्ड मोडून ” विजयी ” होणार की कसे ? याकडे या निवडणुकीत सर्वांचेच लक्ष लागून रहाणार आहे.
- Advertisment -

You cannot copy content of this page