विज कंपनीचा ट्रान्सफॉर्मर ठरतोय अपघाताला आमंत्रण देणारा !

0
202

भिसेगाव-कर्जत(सुभाष सोनावणे)कर्जत नगर परिषद हद्दीतील गुंडगे प्रभागातील गजानन पार्क या नागरिक रहात असलेल्या संकुला शेजारीच कर्जत वीज कंपनीचा विजेचा ट्रान्सफॉर्मर धोकादायक ठिकाणी असल्याने वाहतुकीचा व रहदारीचा अर्धा रस्ता व्यापलेल्या या ट्रान्सफॉर्मरमुळे अपघाताची व जीवितहानीची शक्यता असल्याने वारंवार तक्रारी करूनही वीज कंपनी व कर्जत नगर परिषद या बाबीकडे गांभीर्याने बघत नसल्याने संबंधित कार्यालया विरोधात नागरिकांत संताप खदखदत असून ताबडतोब हा जीवघेणा ट्रान्सफॉर्मर तेथून हलवावा , अशी मागणी छत्रपती शिवाजी राजे तक्रार निवारण संघटनेने केली आहे.

कर्जत नगर परिषदेने एम एम आर डि ए च्या निधीतून नुकतेच येथे सिमेंट काँक्रीटचा रस्ता बनविला आहे.मात्र रस्ता बनविताना केलेल्या मेजरमेन्ट मध्ये रस्त्यात बाधित असलेले विजेचे पोल व ट्रान्सफॉर्मर नवीन ठिकाणी हलविण्याचा चार्ज त्यात ऍड केला नसावा ,हि महत्वाची बाब ना अभियंता यांच्या लक्षात आली ना येथील लोकप्रतिनिधी यांच्या , त्यामुळे वारंवार तक्रारी करूनही रस्ता तयार होऊनही अद्यापी हा ट्रान्सफॉर्मर तिथेच आहे.हा ट्रान्सफॉर्मर रस्त्याच्या मध्यभागी असल्याने रात्रीच्या वेळी वाहन धारक त्यास धडकू शकतो , तसेच येथे शेजारीच गजानन पार्क हे रहिवासी संकुल असल्याने लहान मुलं खेळत या ठिकाणी जाऊ शकतात , तर ट्रान्सफॉर्मरचा प्रसंगी स्फोट झाल्यास त्यामुळे जीवितहानी होण्याची शक्यता दाट असल्याने ताबडतोब हा ट्रान्सफॉर्मर येथून हलविणे गरजेचे वाटते.

याबाबतीत वृत्तपत्रातून वारंवार बातमी करूनही अद्यापी हा ट्रान्सफॉर्मर येथील जाग्यावरून हलवलेला नसून वीज कंपनी व कर्जत नगर परिषद एखादी जीवघेणी घटना घडण्याची वाट बघत आहे कि काय ? असा संतापजनक सवाल छत्रपती शिवाजी राजे तक्रार निवारण संघटना करताना दिसत आहे .