विज दर कमी झाल्याशिवाय विज बील भरू नका , संजय बाळासाहेब भेगडे..

0
41

तळेगाव दाभाडे : राज्य सरकार जोपर्यंत विज दर मागे घेत नाही तोपर्यंत विज बील भरू नका असे आवाहन माजी राज्यमंत्री बाळासाहेब भेगडे यांनी केले आहे.उत्पादनात प्रथम क्रमांकावर असलेला महाराष्ट्र 15 व्या क्रमांकावर फेकला गेला आहे . राज्य सरकारने महाविकास आघाडीच्या माध्यमातून संपूर्ण राज्यामध्ये लोडशेडींग चालू केले असून शेतकरी ग्राहक व व्यवसायिक यांचे कनेक्शन तोडण्याचे काम केले आहे. आघाडी सरकारने महाराष्ट्रातील पंधरा हजार शेती पंप कनेक्शन तर व्यापारी व नागरिकांच्या अनेक कनेक्शन कट केली आहे.

विजेच्या दरात 25 % दरवाढ केली असून सहा महिन्यांच्या मुदतीसाठी सिक्युरिटी डिपॉजिट प्रत्येक नागरिकांकडून घेतले जाणार असल्याने राज्य सरकारचा जनतेवर विश्वास राहिलेला नाही असे चित्र संपूर्ण महाराष्ट्रात उभे राहिले आहे . राज्य सरकार जोपर्यंत 25% दरवाढ व सिक्युरिटी डिपॉजिट रद्द करण्याचा जीआर काढत नाही तोपर्यंत लाईट बिल भरू नका असे आवाहन माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी केले ते तळेगाव दाभाडे येथे पत्रकार परिषदेत बोलत होते.यावेळी कमिशन खाण्यासाठीच लोडशेडिंगचा डाव रचला असल्याचा आरोप त्यांनी राज्य सरकारवर केला.

राज्यातील 10 मोठे संच बंद असून केंद्राकडून कोळसा मिळत नसल्याचे बोंब राज्यातील मंत्री उठवत आहेत . परंतु केंद्राला कोळशाचे 3000 कोटी देणे बाकी असताना केंद्र सरकार कोळसा द्यायला तयार आहे , असे भेगडे यांनी सांगितले . शनिवारी दि.23 रोजी पुणे येथे सर्किट हाऊस मध्ये मावळ तालुक्यातील रेल्वे संदर्भातील नागरिक व प्रवासी यांच्या शिष्टमंडळासमवेत केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची भेट घेत मळवली , तळेगाव स्टेशन , पिंपरी – चिंचवड हद्दीतील रेल्वे स्टेशन लगतच्या बांधकामांबाबत वस्तुस्थिती मांडली . यावर अतिक्रमण विरोधी कारवाई योग्य पद्धतीने केली जाईल असे आश्वासन दानवे यांनी दिल्याचे भेगडे यांनी सांगितले.

कामशेत , वडगाव , बेगडेवाडी या ठिकाणी सुरू असलेल्या भुयारी मार्गाच्या कामातील त्रुटी दूर करण्यासाठी उपाययोजना करा व शक्य त्या ठिकाणी शेड उभे करा , पाण्याचा योग्य निचरा करा अशा सूचना केल्या . कोरोना महामारीनंतर पुणे लोणावळा लोकलच्या फेऱ्या नियमित करा , पुणे इंदोर एक्सप्रेस , सिंहगड एक्सप्रेस या गाड्यांना तळेगाव दाभाडे स्टेशन वर थांबा देण्यात यावा , घोरवडी रेल्वे स्टेशन प्लॅटफॉर्म एका लेवलवर घ्यावा अशी मागणी यावेळी रेल्वे राज्यमंत्री दानवे यांना केली.यावेळी किशोर आवारे , अशोक शेलार , बाळासाहेब शेलार , रवींद्र शेलार , अमोल नाईकनवरे , अमित भेगडे , सुनील पाटील , तुपेल शेख , गोरख दळवी , दिनेश ढगे , सुशील सैंदाणे , निखील भगत , कल्पेश भगत , बाळासाहेब कुंभार , दिनेश मापारी , सुभाष माळी आदी उपस्थित होते . स्वागत रवींद्र माने यांनी केले .