विधान परिषद सदस्य आमदार अमोल मिटकरी यांच्यावर गुन्हा दाखल करा !

0
223

कर्जत तालुका सर्व शाखीय ब्राह्मण समाज सभेची मागणी…

भिसेगाव- कर्जत ( सुभाष सोनावणे )सांगली येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या संवाद यात्रेतील सभेत विधान परिषदेचे सदस्य आमदार अमोल मिटकरी यांनी १९ एप्रिल २०२२ रोजी ब्राम्हण समाजाबद्दल व सातत्याने ब्राह्मण समाजाविषयी गरळ ओकणारे व समाजात तेढ निर्माण होईल असे वक्तव्य तसेच हिंदू धर्म संस्कारांची अवहेलना व अपमान केला , तर या सभेत महाराष्ट्र सरकारचे मंत्री जयंत पाटील व धनंजय मुंढे यांनी हसून आनंद घेत होते , यामुळे यांचा जाहीर निषेध करण्यासाठी आज कर्जत तालुका सर्व शाखीय ब्राह्मण समाज सभा यांनी कर्जत पोलीस ठाण्यात निवेदन सादर करून ताबडतोब गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.

यावेळी समाजामध्ये तेढ निर्माण करणाऱ्या व हिंदू धर्मसंस्कारा विषयी अश्लाघ्य भाषेत टीका टिपण्णी केल्याबद्दल अश्या समाजकंटकावर स्वतःहून गुन्हा दाखल करावा , अशी मागणी ब्राह्मण समाजातर्फे करण्यात आली.यावेळी कर्जत पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुवर्णा पत्की यांना निवेदन देताना कर्जत तालुका सर्व शाखीय ब्राह्मण सभा अध्यक्ष महेश वैद्य , उपाध्यक्ष दिपक वैद्य , सचिव संजीव दातार , खजिनदार विशाल जोशी ,अभिजित मराठे , विजय धारप , प्रवीण गांगल , रंजन दातार , हितेश ठोसर , विवेक भागवत , सतीश मुसळे , चैतन्य मालेवाडकर , समीर सोहनी , संतोष वैद्य तसेच ब्राह्मण समाजातील जेष्ठ व तरुण उपस्थित होते .त्याचप्रमाणे असेच एक निवेदन तहसील कार्यालय – कर्जत येथेही देण्यात आले .