विनयभंगाचे गुन्ह्यातील आरोपीस आणले केरळ राज्यातून !

0
60

कर्जत लोहमार्ग पोलीस ठाण्याची उल्लेखनीय कामगिरी…

भिसेगाव- कर्जत( सुभाष सोनावणे)अस म्हणतात की , ” म्हातारी मेली तरी चालेल , पण काळ सोकावता कामा नये ” , या उक्तीप्रमाणे कर्जत रेल्वे स्थानकात एका तरुणीच्या विनय भंग प्रकरणातील तरुण केरळ येथे गेलेला असलेला असूनही कर्तव्यात चोख कामगिरी बजावणारे कर्जत रेल्वे पोलीस ठाण्यातील जवानांनी केरळ येथे जाऊन त्या आरोपीस जेरबंद करून कर्जतमध्ये आणले.

याबाबतीत सविस्तर वृत्त असे की , दि . १८ मार्च २०२२ रोजी फिर्यादी महिला पुणे बाजुकडील ब्रीजवरून चालत कर्जत बुकींग काउंन्टर येथील जिना उतरुन खाली येत असताना, रात्रो २०/३२ वा. सुमारास समोरुन एका अनोळखी इसमाने फिर्यादीचे समोरून येवून हाताने फिर्यादीचे छातीला स्पर्श करून, फिर्यादीचे मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केल्याने, कर्जत रेल्वे पोलीस ठाणे येथे गु.र.नं २७/२०२२ कलम ३५४. ३५४ अ (१) (आय) भादवि अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.नमुद गुन्ह्याचा तपास करीत असताना, गुन्ह्यातील आरोपीचे सी.सी.टी.व्ही फुटेज व तांत्रिक पद्धतीने तसेच खास खबरीमार्फत गुन्हे तपास पथकातील पोलीस अमलदार सपोनि अतुल ठोंबरे, पोहवा ३३१६ ज्ञानेश्वर पाटील, पोना १४४२ सुनिल ठाकुर, पोशि ११३७ समिर पठाण, पोशि ०६२ निकेश तुरडे, पोशि १९८ गणेश शेटे, पोशि १७५२ अक्षय पेरनेकर यांनी शोध घेतला असता.

मिळालेल्या माहितीद्वारे नमुद गुन्ह्यातील सी.सी.टी.व्ही फुटेजमध्ये दिसून येणारा आरोपी हा जयंता जयदेब गांगुली, राह – गजीरढाल, मायाहौरी, दारा, जयनगर २, साउथ २४, परगनास, प. बंगाल, असल्याचे व तो सध्या कोझिकोडे, केरळ येथे गेला असल्याचे समजले.तेव्हा दिनांक ०५ एप्रिल २०२२ रोजी गुन्हे तपास पथकातील पोलीस अमलदार सपोनि अतुल ठोंबरे, पोहवा ३३१६ ज्ञानेश्वर पाटील, पोशि ०६२ निकेश तुरडे असे त्याच्या राहत्या पत्यावर कोझिकोडे, केरळ येथे जाऊन आरोपीचा शोध घेवुन, त्यास ताब्यात घेवुन नमुद गुन्ह्यात अटक करण्यात आली.सदरच्या गुन्हा तपासात कर्जत रेल्वे पोलीस स्थानकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संभाजी यादव यांचे अचूक मार्गदर्शन झाले.