विर भगतसिंग क्रिकेट स्पर्धेचा सुमेध फाईटर संघ विजेता…

0
75

लोणावळा :लोणावळा आयोजित विर भगतसिंग तीन दिवसीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचा सुमेध फाईटर हा संघ प्रथम विजेता.

अनेक वर्षांपासून लोणावळा रेल्वे ग्राउंड येथे सालाबादप्रमाणे होत असणाऱ्या विर भगतसिंग या तीन दिवसीय आठ शटकाच्या सामन्यात सामील झालेल्या सर्व संघांनी खेळाचे जंगी प्रदर्शन केले आहे. त्यामुळे अनेक क्रिकेट प्रेमी व प्रेक्षकांचे खऱ्या अर्थाने मनोरंजन केले आहे.रेल्वे ग्राउंड येथे दर वर्षी आयोजित होणाऱ्या या स्पर्धेचे नियोजन शिस्त बद्ध असल्यामुळे ही स्पर्धा सर्व प्रेक्षकांना प्रिय असून यावेळी अनेक क्रिकेट रसिकांनी या स्पर्धेचा आनंद घेतला असल्याचे मत अनेक रसिकांनी व्यक्त केले आहे.

या स्पर्धेचे मुख्य आयोजक सतपाल सिंग रोर व लोणावळा क्रिकेट असोसिएशनचे मुख्य मार्गदर्शक व लोणावळा शहर पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष निखिल कवीश्वर यांच्या हस्ते मालिकेचा बक्षीस वितरण समारंभ संपन्न झाला.

या स्पर्धेचा मालिका विर हा खिताब सुमेध फाईटर या संघाने पटकाविला असून, दृतीय क्रमांकाचे पारितोषिक गोल्डन वारीयर्स, तर तृतीय क्रमांक रिधिमा 11 यांनी मिळविला आहे तर चतुर्थ क्रमांक टिकू 11 या संघाने मिळविला आहे.

यावेळी निखिल कवीश्वर यांनी पारितोषिक वितरण करताना सर्व स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या.