वीरशैव लिंगायत समाजाचे गुरुवर्य श्रीगुरु गुरुसिद्ध मणीकंठ शिवाचार्य दहीवडीकर महाराज यांचे कर्जतमध्ये दर्शन सोहळा संपन्न !

0
256
भिसेगाव – कर्जत(सुभाष सोनावणे )हिन्दू धर्मात भक्तीपंथाचे स्थान फार मोठे आहे. देविदेवतांचे बरोबरच आपल्या गुरूंप्रती श्रद्धा ठेवून जर त्यांच्या नामाचा जप , सत्सेवा , सत्पात्रे , दान केले तर खडतर प्रारब्धसुद्धा आनंदी होते. कलियुगात वेगाने चालत असलेल्या जीवनात ईश्वरीशक्ती पूरक गुरु भक्तीचे माध्यम ठरत आहे .ईश्वरी शक्तीचा उगम जरी कुठेही असला तरी त्याचा अंश गुरूंमध्ये पहाण्यास मिळतो.
सर्वांचे आयुष्य आनंदमय करणारे व संकटाच्या वेळी हाक मारली असता संकट निवारण करणारे वीरशैव लिंगायत समाजाचे गुरुवर्य ष.ब्र.प्र. १०८ श्रीगुरु गुरुसिद्ध मणि मणीकंठ शिवाचार्य दहीवडीकर महाराज , बार्शी मठ यांचे आगमन व दर्शन तसेच आशीर्वाद सोहळा पिंपरे परिवार – पाटील आळी ,कर्जत येथे त्यांच्या घरी संपन्न झाले.यावेळी अनेक वीरशैव लिंगायत समाज , भक्तगण यांची उपस्थिती होती.

कर्जत नगर परिषद हद्दीतील धापया मंदिर देवस्थान शेजारी , पाटील आळी कर्जत येथे रहाणारे श्री.व सौ.सुरेशशेठ पिंपरे यांनी त्यांच्या घरी महाराजांचे पाद्यपुजन केले .यावेळी द्राक्षानी ढोले, शालीनी पिंपरे , राजमाने काकू ,श्री व सौ नगरकर , अनिल अंदळकर, श्री व सौ.नितीन पिंपरे , राजेंद्र खिलारे , महेंद्र बोडके, नितीन वाणी, सोनु हिंगमिरे , कैलास पोटे , अमृतशेठ , महेश गवळे , पत्रकार सुभाष सोनावणे , रविंद्र जंगम , समृद्धी , भाग्यश्री , आदींनी दर्शनाचा लाभ घेतला.
महाराज आपल्याला लवकरच कार्यक्रमासाठी दोन दिवसांचा वेळ देणार असल्याचे सतिशशेठ पिंपरे यांनी सांगितले तर पुर्व नियोजित कार्यक्रमाला जायचे असल्याने मला जास्त वेळ थांबता येत नाही , ही खंत महाराजांनी बोलुन दाखवली.कै.रमेशशेठ पिंपरे यांची काल ८२ वी जयंती निमित्ताने तसेच रमेशशेठ व बार्शी मठाचे जवळचे ऋनाणुबंध होते याची आठवण त्यांनी (दुबे मेन्शन) हेमंत डोंबे यांच्या समोर बोलुन दाखवली.” साधु स्ंत येती घरा , तोची दिवाळी दसरा ” ,श्री गुरुवर्य दहीवडीकर महाराजांच्या दर्शनाने व आशीर्वादाने सर्वांच्या चेहऱ्यावर आन्ंद प्रकट होताना दिसत होता.