Saturday, September 21, 2024
Homeपुणेतळेगाववेश्या व्यवसायाच्या उद्देशाने,सार्वजनिक शिष्टाचार व सभ्यतेचा भंग केल्याप्रकरणी दोन महिलांवर गुन्हा दाखल…

वेश्या व्यवसायाच्या उद्देशाने,सार्वजनिक शिष्टाचार व सभ्यतेचा भंग केल्याप्रकरणी दोन महिलांवर गुन्हा दाखल…

मावळ (प्रतिनिधी): महामार्गावर वेश्याव्यवसाय करण्याच्या उद्देशाने लैंगिक हावभाव करणाऱ्या दोन महिलांवर तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे . सोमवार दि.14 रोजी जुना मुंबई – पुणे महामार्ग ,सीआरपीएफ गेट नं.2 समोर ही कारवाई करण्यात आली .
याप्रकरणी सचिन संजिवन शिंदे ( वय 29 , रा.भैरवनगर , आनंद पार्क , धानोरी विश्रांतवाडी ) यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून महिला आरोपी ( वय 33 ) व महिला आरोपी ( वय 32 ) यांच्यावर अनैतीक मानवी वाहतुक प्रतिबंध कायदा कलम 8 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तळेगाव दाभाडे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्याच्या हद्दीत जुना मुंबई-पुणे महामार्गावर सीआरपीएफ गेट नं.2 समोर सार्वजनिक रोडवर आरोपी महिला यांनी वेश्याव्यवसाय करण्याच्या उद्देशाने लैंगिक हावभाव करून शब्द उच्चारून सार्वजनिक ठिकाणी येणाऱ्या – जाणाऱ्या लोकांना अडथळा निर्माण करून सार्वजनिक शिष्टाचार व सभ्यतेचा भंग होईल असे कृत्य केले आहे.वरिष्ठाच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पोलीस नाईक भोईर हे करत आहेत.
- Advertisment -

You cannot copy content of this page