Saturday, October 1, 2022
Homeपुणेपिंपरी चिंचवडवेश्या व्यवसाय प्रकरणी निगडी पोलिसांची दोन लॉजवर कारवाई,5 महिलांची सुटका 78 हजाराचा...

वेश्या व्यवसाय प्रकरणी निगडी पोलिसांची दोन लॉजवर कारवाई,5 महिलांची सुटका 78 हजाराचा मुद्दयेमाल जप्त !

निगडी : वेश्या – व्यवसाय प्रकरणी दुर्गानगर आणि थरमॅक्स चौकाजवळील दोन लॉजवर निगडी पोलिसांनी कारवाई केली . त्यात पाच महिलांची वेश्या व्यवसायातून सुटका करण्यात आली आहे.

शुक्रवार दि .1 रोजी दुपारच्या सुमारास या कारवाया करण्यात आल्या. पहिली कारवाई दुर्गानगर चौकातील “मिलन लॉजिंग अँड बोर्डिंग”या लॉजमध्ये करण्यात आली . मॅनेजर प्रदीप माधवा पुजारी ( वय 32 , रा . निगडी ) , चालक मालक शशांक शेट्टी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे . प्रदीप याला अटक केली असून त्याच्याकडून 63 हजार 675 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे . या कारवाईमध्ये चार महिलांची वेश्या व्यवसायातून सुटका करण्यात आली आहे.


तर , दुसरी कारवाई थरमॅक्स चौक ते दुर्गा चौक दरम्यान असलेल्या ” साईदीप ” लॉजमध्ये करण्यात आली .याठिकाणी दीपेन दिनेश शेट्टी ( वय 30 , रा . पुनावळे ) , विवेक नोबराज विश्वकर्मा ( वय 25 , रा . चिंचवड . मूळ रा . नेपाळ ) या दोघांना अटक केली आहे.आरोपी दोघेजण एका महिलेकडून वेश्या व्यवसाय करून घेत असल्याची माहिती मिळाल्याने पोलिसांनी छापा मारून कारवाई केली . यात एका महिलेची सुटका करत 14 हजार 560 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे . दोन्ही गुन्ह्यांचा तपास निगडी पोलीस करीत आहेत.

- Advertisment -

You cannot copy content of this page