Wednesday, October 16, 2024
Homeपुणेलोणावळावेहेरगाव तलावात अनोळखी व्यक्तीचा बुडून मृत्यू : मृतदेह बाहेर काढण्यात शिवदुर्गं रेस्क्यू...

वेहेरगाव तलावात अनोळखी व्यक्तीचा बुडून मृत्यू : मृतदेह बाहेर काढण्यात शिवदुर्गं रेस्क्यू टिमला यश….

कार्ला – वेहेरगाव येथील तलावात एका अनोळखी व्यक्तीचा बुडून मृत्यू झाल्याची घटना दि. 27 रोजी उघडकीस आली आहे. शिवदुर्ग रेस्क्यू टीमच्या मदतीने या व्यक्तीचा मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात यश आले आहे.
वेहेरगावच्या एकविरादेवी पायथा मंदिराजवळील तलावात एक व्यक्ती बुडाल्याची माहिती पोलीस पाटील अनिल पडवळ यांना मिळताच, त्यांनी तत्काळ स्थानिक पोलीस आणि शिवदुर्ग मित्रांना याची माहिती दिली. रेस्क्यू पथकाने काही वेळातच अंदाजे 25 ते 30 वयोगटातील अनोळखी व्यक्तीचा मृतदेह बाहेर काढला.
मिळालेल्या माहितीनुसार, गुरूवारी (दि. 26) रात्री तलावकाठी कपडे आणि चप्पल आढळल्याने अनिल पडवळ यांनी गावात चौकशी केली. चौकशीत ही व्यक्ती गावातील नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्यांनी लोणावळा ग्रामीण पोलीस आणि शिवदुर्ग मित्र यांना कळवले.
मृत व्यक्तीची ओळख पटलेली नसल्यामुळे त्याचा मृतदेह बेवारस म्हणून खंडाळा येथे शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक अजय दरेकर करत आहेत.
- Advertisment -

You cannot copy content of this page