Saturday, September 21, 2024
Homeपुणेमावळवेहेरगाव दहिवली ग्रुप ग्रामपंचायत सरपंचपदी पुजा अशोक पडवळ बिनविरोध…

वेहेरगाव दहिवली ग्रुप ग्रामपंचायत सरपंचपदी पुजा अशोक पडवळ बिनविरोध…

कार्ला : वेहेरगाव दहिवली ग्रुप ग्रामपंचायतच्या सरपंचपदी पुजा अशोक पडवळ यांची बिनविरोध निवड करण्यात आली. वर्षा मावकर यांनी आपल्या सरपंच पदाचा राजीनामा दिल्याने कार्ला मंडल अधिकारी आशा धायगुडे यांच्या मार्गदर्शनाखाली वेहरगाव ग्रुपग्रामपंचायत सरपंच पदाची निवडणूक घेण्यात आली.
सरपंचपदासाठी निर्धारीत वेळेत पडवळ यांचा एकमेव अर्ज आल्याने निवडणूक निर्णय अधिकारी धायगुडे व सहाय्यक अधिकारी ग्रामसेवक गणेश आंबेकर यांनी मावकर यांची सरपंचपदी बिनविरोध निवड जाहीर केली.
यावेळी माजी सरपंच वर्षा मावकर, उपसरपंच शंकर बोरकर, माजी उपसरपंच काजल पडवळ, सदस्य राजु देवकर, सुनिल येवले, अनिल गायकवाड, योगिता पडवळ, ग्रामसेवक गणेश आंबेकर यांनी पुष्पगुच्छ देऊन पुजा पडवळ यांचा सत्कार केला.
यावेळी पुणे जिल्हा नियोजन समिती सदस्य शरद हुलावळे, भाजपा नेते रविंद्र भेगडे, शिवसेना उपजिल्हाप्रमूख सुरेश गायकवाड, महिला अध्यक्षा सायली बोत्रे, जितेंद्र बोत्रे, माजी सरपंच गणपत पडवळ, सचिन येवले, दत्तात्रय पडवळ, चंद्रकांत देवकर, संतोष रसाळ, तंटामुक्ती अध्यक्ष मधुकर पडवळ, ज्ञानेश्वर देवकर, संचालक शरद कुटे, मंगेश हुलावळे, अशोक पडवळ, मोरेश्वर पडवळ, शरद कुटे, नवनाथ पडवळ, चंद्रकांत शेलार, भगवान बोरकर, माऊली बोत्रे, दिनेश पडवळ, योगेश पडवळ यांच्यासह वेहेरगाव दहिवली ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.
- Advertisment -

You cannot copy content of this page