Saturday, September 21, 2024
Homeमहाराष्ट्ररायगड" व्यसनाधिनता " म्हणजे शरीराला पोखरणारा आजार - समुपदेशक देवश्री जोशी..

” व्यसनाधिनता ” म्हणजे शरीराला पोखरणारा आजार – समुपदेशक देवश्री जोशी..

भिसेगाव – कर्जत ( सुभाष सोनावणे ) आजकाल धावपळीच्या व स्पर्धेच्या युगात दिलेले उद्दिष्ट साध्य करण्यासाठी अहोरात्र काम करावे लागते , तर कॉलेज जीवनात देखील स्पर्धा परिक्षेत अव्वल येण्यासाठी भरपूर मेहनत घ्यावी लागते , त्यामुळे येणाऱ्या ताण तणावामुळे एखाद्या व्यसनाची ” लत ” लागून ऐन तरुणाईत तरुण व्यसनाच्या आहारी जाणे , त्याची सवय लागणे , हे आपण सर्वत्र पहात आहोत . हि सवय वेळीच न सोडविल्यास हा भयानक आजार शरीराला ” पोखरून ” त्या व्यक्तिसहित अनेक कुटुंबांना देशोधडीस लागलेले , आपण सर्रास पहात आलो आहोत . या व्यसनाधिनता वर समुपदेशन केल्यास यातून वेळीच तुम्ही बाहेर पडू शकता , असे महत्त्वपूर्ण मत मनःस्वास्थ्य क्लिनिक कर्जतच्या समुपदेशक देवश्री जोशी यांनी व्यक्त केले आहे.

” व्यसनाधिनता आणि समुपदेशन ” ह्याचा खूप जवळचा संबंध आहे . हा आजार मेंदूशी निगडित आहे . व्यसनाधिनता म्हणजे एखाद्या गोष्टीची किंवा पेयाची सातत्याने इच्छा होणे . आपल्याला हा शब्द जास्त करून दारू, सिगारेट किंवा अंमली पदार्थ घेणे , ह्याबाबतीत माहिती आहे. पण मानसशास्त्राच्या मते कुठल्याही गोष्टींचा अतिरेक करणे किंवा अति वापर करणे म्हणजे व्यसनाधिनता होय.

खूप जणांना चहा – कॉफी पेय , शीतपेय (कोल्डड्रींक्स), मोबाईल वापर , मोबाईल गेम्स, सातत्याने प्रकाश झोतात असणे किंवा ग्रुप जमल्या नंतर मी कशी छान / मी कसा किंवा माझे कुटुंब कसे भारी , आम्हीच कसे महागड्या वस्तू वापरतो ह्याचे प्रदर्शन करणे , किंवा सतत नकारात्मकच विचार बोलून समोरच्या माणसाचं खच्चीकरण करणे , त्याचप्रमाणे दारू, सिगारेट किंवा अंमली पदार्थ सेवन ह्या गोष्टी येतात . माणसाच्या कुठल्या पण सवयीने समोरच्या व्यक्तीला त्रास होणे म्हणजे तुम्ही व्यसनाधिनतेच्या आहारी गेला आहात हा त्याचा अर्थ होतो , मग ते विचार असू दे , किंवा एखादी कृती असुदे , यावर समुपदेशक देवश्री जोशी यांनी प्रकाश टाकला.

माणूस हा समाजशील प्राणी म्हणून ओळखला जातो , त्यामुळे आपल्या सततच्या कृतीमुळे जर समोरच्या अनेक व्यक्तींना त्रास होत असेल तर आपल्याला नक्कीच ती सवय ते व्यसन समजून त्यावर उपाय करण्याची गरज आहे . आपण वावरत असलेल्या ठिकाणी आपल्या समोर वेगवेगळ्या प्रकारची लोकं असतात , एखादी व्यक्ती सतत दारू किंवा सिगारेट पित असेल तर संपूर्ण कुटुंब त्याच्या ह्या व्यसनाला कंटाळेलेले असते , त्याचे आई वडील , जर लग्न झाले असेल तर त्याची बायको व मुलं . जी व्यक्ती सातत्याने दारू पीत असते त्या व्यक्तीला फारसा फरक पडत नसतो , त्याच्या ह्या व्यसनामुळे तो त्याची नशा करून झोपून जातो , किंवा घरी दारी शिव्या देतो , मनासारखं घडलं नाही कि बायकोला मारतो , आणि कालांतराने त्या माणसाला असं वाटायला लागतं कि सगळं जग माझ्या विरोधात आहे , सगळे माझ्या विरोधात बोलत आहेत आणि ह्या सगळ्या मध्ये मानसिक आजाराची सुरवात होते. कधी कधी मानसिक आजाराची सुरूवात उशिरा समजते , त्यातूनच शरीराला असाध्य आजार सुरु झालेले असतात , लिव्हर खराब झालेलं असतं , किडनी वर ताण येतो, हृदय नीट काम करेनास होत , कॅन्सरचे निदान होण्याची शक्यता वाढलेली असते , त्यामुळे आपल्या एका दारूच्या किंवा इतर व्यसनामुळे काय काय होऊ शकत हे वेळीच ओळखून त्यावर उपाय करून व्यसनमुक्त जीवन जगूयात , व कुटुंबाला हि सुखाने जगू द्यात . जी जी लोकं दारूचं व्यसन करतात त्यांनी हे नक्की लक्षात ठेवा ” दारूचं व्यसन थांबवायला कधीच उशीर झालेला नसतो “.या व्यसनाधिनतेची सुरुवात एखादी गोष्ट पिल्याने किंवा एखादी गोष्ट बघून आनंद मिळतो / वाटतो , आणि मग ती गोष्ट सारखी सारखी करावीशी वाटणं किंवा सारखी सारखी पिणं ह्यातून त्याचा प्रवास सुरु होतो , मग आपल्या मेंदूला त्याची सवय होते . जर आपण आपल्या शरीराला ती वस्तू किंवा ते पेय घेतलं नाही तर चिडचिडेपणा , काही न सुचणं, काही करावंसं न वाटणं म्हणजेच कुठल्या ही कामात उत्साह न वाटणं , झोप न येणं , बैचैन होणं ह्या सगळ्या गोष्टींची सुरुवात होते म्हणजेच आधी आपण आपल्या मेंदूला सवय लावतो.
एखाद्या गोष्टीपासून मला आनंद मिळत आहे , मग ते चहा पिणं असू दे , दारू पिणं असू दे , किंवा सतत संशय घेणं असुदे , अगदी नकारात्मक विचार करणं असू दे , ह्या सर्वांची सुरुवात आधी आपल्या मेंदूपासून होते आणि नंतर मग ती शरीराची सवय बनत जाते .आणि मग आपण त्या व्यसनाच्या अधीन होत जातो किंवा व्यसनाधिन होतो . हा विषय खूप मोठा आहे , ह्या मध्ये शरीराबरोबरच मेंदूमध्ये पण रासायनिक दृष्ट्या अनेक बदल घडत असतात , प्रत्येक व्यसनावर पर्याय आहेत, औषधोपचार आहेत , समुपदेशन आहेत , पण ह्या सगळ्यात तुमच्या ” मनाचा निश्चय ” खूप महत्वाचा आहे.
तुम्हाला जर असं कुठलं व्यसन असेल आणि ते कमी करायचं असेल या मृत्यूच्या विळख्यातून बाहेर पडायचं असेल तर नक्की आजचं देवश्री जोशी – ९५२७६७६००८ यावर संपर्क करा , ” तुम्हाला व्यसनाधिनते कडून निरोगी माणसाकडे ” जाण्याच्या प्रवासात ” मनःस्वास्थ्य क्लिनिक ” कर्जतच्या समुपदेशक म्हणून मी देवश्री जोशी सदैव आपल्याला समुपदेशन करण्यास समर्थ आहे , अशी ग्वाही त्यांनी दिली.
- Advertisment -

You cannot copy content of this page