व्ही पी एस महाविद्यालयाचा 99 वा वर्धापन दिन उत्सहात साजरा…

0
45

लोणावळा : विद्या प्रसारिणी सभेचा 99 वा वर्धापन दिन उत्सहात साजरा झाला. वर्धापन दिनानिमित्त व्ही.पी. एस. हायस्कूल लोणावळा येथे सन्मान सभेचे आयोजन करण्यात आले होते.या निमित्त यावर्षीचे आदर्श शिक्षक म्हणून मल्लिकार्जुन कल्याणकस्तुरे, सुरेखा आहिरे, आरती कदम तसेच प्रकल्पासाठी शुभांगी कडू यांना सन्मानित करण्यात आले.

यावेळी विद्या प्रसारिणी सभेचे कार्यवाह डॉ.सतीश गवळी, प्रमुख पाहुणे म्हणून रामानंद चारीटेबल ट्रस्ट वरसोली चे संचालक विजय कुकरेजा, विनोद आगरवाल, कुकु कोहली, कॅप्टन मेहता,वरसोली गावचे माजी सरपंच राजू खांडेभरड इत्यादी उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि पाहुण्यांचा परिचय प्राचार्य रामदास दरेकर यांनी केले. तर वर्धापन दिनानिमित्त विद्या प्रसारिणी सभा आणि व्ही.पी.एस. हायस्कूलचा इतिहास जेष्ठ लिपिक भगवान आंबेकर यांनी आपल्या ओघवत्या वाणी मधून सर्वांसमोर मांडला.


यावेळी कन्हैयालाल भुरट, अरविंद भाई मेहता, धीरूभाई टेलर, संदीप अग्रवाल,नितीन भाई शहा, गिरीष शेठ पारख, उपप्राचार्य आदिनाथ दहिफळे,शां.गो. गुप्ता विद्यालयाच्या प्राचार्या वर्षा क्षिरसागर,भीमराव माने, सुनीता ढिले,मंगल जाधव,आरती कदम, डॉ.चंद्रशेखर भगत इत्यादी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वर्षा कुलकर्णी व गायत्री जामखिंडीकर यांनी केले तर माहिती संकलन संजय पालवे यांनी केले.

स्वागतगीत धनंजय काळे, सिद्धी साखळकर,सुशोभन चंद्रकांत जोशी,धुळाजी देवकाते यांनी गायले व आभार प्रदर्शन मंगल जाधव यांनी केले.