व्ही पी एस हायस्कूलचे सेवानिवृत्त अध्यापक गजानन पिंगळे सर यांचे दुःखद निधन…

0
154

लोणावळा : व्ही पी एस हायस्कूलचे सेवानिवृत्त अध्यापक पर्यवेक्षकगजानन रामचंद्र पिंगळे सर यांचे दि ३ /१२ /२०२१ रोजी सायंकाळी साडेआठ वाजता वर्षभराच्या दुर्धर आजाराशी संघर्ष करीत दु:खद निधन झाले. ते ७७ वर्षांचे होते, त्यांच्यामागे मुलगा मनिष, विवाहित कन्या वृषाली, नातवंडे आणि भावांची कुटुंबे असा मोठा परिवार आहे.


शाळेतील सुमारे पस्तीस वर्षांच्या शैक्षणिक सेवेनंतर ते पर्यवेक्षक पदावरुन निवृत्त झाले होते. हिंदी व संस्कृत विषयांचे अध्यापन करीत असत. शाळेवर अपार प्रेम असणारे विद्यार्थीप्रिय, शिस्तप्रिय, ज्ञानी, गुणी अध्यापनकुशल शिक्षक अशी त्यांची ख्याती होती. अध्यापनात विनोदांचा चपखल वापर करुन ते प्रभावी करण्याचे कौशल्य सरांकडे होते.

पौरोहित्य च्या माध्यमातून लग्नकार्ये, पूजा, वास्तुशांती, अभिषेक, कुंडली व पत्रिका तयार करणे व त्यातून मार्गदर्शन करण्याच्या सामाजिक कार्यात सरांचा हातखंडा होता.
गवळीवाडा येथील श्रीराम मंदिराचे पुजारी म्हणून मागील चार पिढ्यांपासून पिंगळे कुटुंब योगदान देत आहे. सरांच्या जाण्याने गवळीवाडा परिसरातही शोककळा पसरली आहे.

सरांच्या रुपाने पिंगळे कुटुंबाचा मार्गदर्शक हरपला आहे.
त्यांची अंत्ययात्रा आज सकाळी ११ वाजता लोणावळा शहरातील वर्धमान सोसायटीतील वर्धमाश एन्क्लेव्ह येथील राहत्या घरापासून निघाली व अंत्यविधी कैलास नगर स्मशानभूमीत पार पडला असल्याची माहिती त्यांचे पुतणे मंदार पिंगळे यांनी दिली.

व्ही पी एस चे सेवानिवृत्त प्राचार्य विजय जोरी यांनी दिलेल्या माहितीवरुन.व्हीपीएस परिवार तर्फे भावपूर्ण श्रद्धांजली.