लोणावळा : विद्या प्रसारिणी सभेच्या व्ही.पी.एस हायस्कूल मध्ये स्काऊट आणि गाईडचे जनक लॉर्ड बेडन पॉवेल यांच्या जन्मदिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
लॉर्ड बेडन पॉवेल यांच्या जन्मदिनानिमित्त जगभरामध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. या निमित्त प्रशालेमध्ये चिंतन दिन साजरा करण्यात आला. हिंदू, मुस्लिम, बौद्ध, जैन आणि ख्रिश्चन धर्माच्या प्रार्थना या निमित्ताने सादर करण्यात आल्या. सर्वधर्मीय प्रार्थनेमुळे विद्यार्थ्यांच्या मनामध्ये इतर धर्माविषयी आदर निर्माण होतो.
कार्यक्रमासाठी प्रशालेच्या उपमुख्याध्यापिका श्रीमती.सुनिता ढिले, पर्यवेक्षक श्री.विजय रसाळ, श्री.श्रीनिवास गजेंद्रगडकर, पर्यवेक्षिका श्रीमती.क्षमा देशपांडे आणि मुख्य लिपिक श्री. कुंडलिक आंबेकर उपस्थित होते.कार्यक्रमास उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले.
यावेळी स्काऊट लीडर श्री.गंगाधर गिरमकर यांनी स्काऊट गाईड चळवळीचा इतिहास सांगत विद्यार्थ्यासमवेत स्काऊट प्रार्थना घेतली.तसेच स्काऊट लीडर श्री.संजय पालवे यांनी वचनविधी पार पाडली.
कार्यक्रमासाठी नियामक मंडळ सदस्य आणि शाळा समिती अध्यक्ष श्री.भगवानभाऊ आंबेकर आणि प्रशालेचे प्राचार्य श्री.उदय महिंद्रकर यांनी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे नियोजन व सूत्रसंचालन स्काऊट लीडर श्री.संजय पालवे यांनी केले. प्रास्ताविक स्काऊट लीडर श्री.गंगाधर गिरमकर तर आभार गाईड कॅप्टन श्रीमती.वैशाली तारू यांनी मानले.