Thursday, June 1, 2023
Homeपुणेलोणावळाव्ही.पी.एस.हायस्कूल व द. पू. मेहता ज्युनिअर कॉलेजच्या प्राचार्यपदी रामदास दरेकर यांची नियुक्ती...

व्ही.पी.एस.हायस्कूल व द. पू. मेहता ज्युनिअर कॉलेजच्या प्राचार्यपदी रामदास दरेकर यांची नियुक्ती…

लोणावळा : विद्या प्रसारिणी सभेच्या व्ही. पी.एस. हायस्कुल व द. पू. मेहता ज्युनिअर कॉलेजच्या प्रचार्यपदी रामदास दरेकर.

विद्या प्रसारिणी सभेमध्ये नुकत्याच झालेल्या बदलामधून
सदर नियुक्ती करण्यात आली. तर प्राचार्या उज्वला पिंगळे यांची विद्या प्रसारिणी सभेच्या भारत इंग्लिश स्कुल व कनिष्ठ महाविद्यालय पुणे येथे बदली झाल्याबद्दल शाळेत एक छोटा समारंभ आयोजित केला होता. त्यावेळी शाळेचा निरोप घेण्यासंदर्भात बोलताना प्राचार्या पिंगळे यांच्या भावना दाटून आल्या त्यांनी शाळा, शिक्षक, विध्यार्थी व पालक यांच्या विषयी समाधान व्यक्त केले.

तर दरेकर सर यांनी प्राचार्य पदाचा पदभार स्वीकारताना हे पद आपल्यासाठी आव्हाहणात्मक असून आपण याला योग्य न्याय देऊ असे सांगितले.यावेळी आयोजित समारंभात उपप्राचार्य आदिनाथ दहिफळे, पर्यवेक्षक दादाभाऊ कासार, चंद्रकांत जाधव, भिमराव माने, जेष्ठ लिपिक भगवान आंबेकर, चांगदेव पिंगळे आदी शिक्षक उपस्थित होते.

You cannot copy content of this page