शहरातील दुकानांवर मराठीत पाट्या लावण्यात याव्यात, लोणावळा शहर मनसे ची मागणी !

0
66

लोणावळा : महाराष्ट्र राज्य सरकारने मंत्रिमंडळात महाराष्ट्र आस्थापना कायदा अंतर्गत दुरूस्ती करत दुकानांच्या पाट्या मराठी देवनागरी अक्षरात करणे सक्तीचे केले आहे.

राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करत लोणावळा शहरातील सर्व दुकानावर येत्या 15 दिवसात मराठी देवनागरी मोठ्या अक्षरात पाट्या लावण्याचे आदेश लोणावळा नगरपरिषदे मार्फत काढण्यात यावे असे निवेदन महाराष्ट्र नवनिर्माण सेना लोणावळा शहर अध्यक्ष भारत रमेश चिकणे यांच्या नेतृत्वाखाली लोणावळा नागरपरिषदेचे उपमुख्यधिकारी भगवानजी खाडे साहेब यांना देण्यात आले आहे.

यावेळी मावळ तालुका उपाध्यक्ष रमेशभाऊ म्हाळसकर,मा.तालुका माथाडी अध्यक्ष निखील भोसले,मा.तालुका टेलिकॉम अध्यक्ष रफिक शेख,टेलिकॉम उपाध्यक्ष रितेश भोमे,संघटक मधुर पाटनकर,विभाग अध्यक्ष अभिजित फासगे, रोहीदास शिंदे,अजिंक्य बोभाटे, कैवल्य जोशी आदी महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.