Monday, March 27, 2023
Homeपुणेवडगावशहरातील सीसीटिव्ही कॅमेरे कार्यान्वित करण्यात यावेत, वडगांव भाजपा महिला मोर्चा ची मागणी….

शहरातील सीसीटिव्ही कॅमेरे कार्यान्वित करण्यात यावेत, वडगांव भाजपा महिला मोर्चा ची मागणी….

मावळ (प्रतिनिधी): वडगांव शहराची वाढती लोकसंख्या, शासकीय कार्यालये, त्यात होणारी गर्दी, बाजारपेठ परिसरातील गजबज आदी बाबी लक्षात घेत शहरात सीसीटिव्ही कॅमेरे कार्यान्वित करणे आवश्यक असल्यामुळे नगरपंचायत आणि पोलिसांनी याबाबत तात्काळ कार्यवाही करावी,अशी मागणी वडगाव भाजपा महिला मोर्चाकडून करण्यात आली आहे.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, वडगाव शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन, तसेच अनेक शासकीय कार्यालये असल्यामुळे वडगांव शहरात नागरिकांची वर्दळ वाढत आहे. या गर्दीचा गैरफायदा घेऊन चोऱ्या, वाटमारी, छेडछाड असे अनेक प्रकार नेहमी घडत आहेत. तसेच अनेक ठिकाणे नशापान करण्याची केंद्रे बनत आहेत व याचा समस्त वडगावकर नागरिकांस मनस्ताप सहन करावा लागत आहे. महिलावर्ग भीतीच्या छायेखाली वावरत आहे.या सर्व गोष्टींना आळा बसावा यासाठी वडगाव शहर भाजपा महिला मोर्चाने शहरात सर्व वर्दळीच्या तसेच प्रमुख ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत अथवा असलेले कार्यान्वित करावेत अशी आग्रही मागणी नगरपंचायत व वडगाव पोलीस चौकी येथे भाजपा महिला आघाडी अध्यक्षा धनश्री भोंडवे यांनी महिला मोर्चाचे वतीने निवेदन देऊन केली आहे.
यावेळी माजी उपनगराध्यक्षा, नगरसेविका अर्चना म्हाळसकर, वैशाली ढोरे, अश्विनी बवरे, सुमन खेंगले, सुनिता जाधव, संगीता खेंगले, भक्ती जाधव, अक्षदा खेंगले आदीसह महिला मोर्चाच्या सदस्या उपस्थित होत्या.

You cannot copy content of this page