Saturday, November 2, 2024
Homeपुणेवडगावशहरात सुरु असलेली गावठी दारूविक्री हद्दपार करा,मोरया महिला प्रतिष्ठान वडगाव.

शहरात सुरु असलेली गावठी दारूविक्री हद्दपार करा,मोरया महिला प्रतिष्ठान वडगाव.

वडगाव दि.2: वडगाव मधील मोरया महिला प्रतिष्ठान गावठी दारू विरोधात आक्रमक. कोरोना काळात गेली एक वर्षांपासून वडगाव रेल्वे स्टेशन परिसरात सुरु असलेली गावठी दारू विक्री बंद करण्यासाठी अनेक वेळा प्रतिष्ठानच्या वतीने प्रयत्न करून सुद्धा दारू विक्री सातत्याने सुरूच आहे.

रेल्वे लाईन जवळ गावठी दारूविक्री सुरु असल्यामुळे दारुड्यांचा रस्त्यावर होत असलेल्या गैर वर्तणामुळे सामाजिक शांतता भंग होत आहे. तिथून ये जा करणाऱ्या महिलांना लज्जास्पद वाटण्यासारखे प्रकार दारुड्यांकडून घडत आहेत तसेच रेल्वे लाईन जवळ विक्री होत असलेली गावठी दारू पेऊन तिथे रेल्वे लाईन ओलांडताना अपघात होण्याची दाट शक्यता असल्यास येथील प्रशासनाने गावठी दारू विक्रीवर कारवाई करावी आणि हे अवैध धंदे कायमस्वरूपी बंद करण्यासाठी प्रयत्न करावे इत्यादी मांगण्यासाठी आज मोरया महिला प्रतिष्ठान वडगावच्या वतीने वडगाव नगरपंचायत व वडगाव मावळ पोलीस ठाण्यात महिलांच्या स्वाक्षरी असलेली लेखी तक्रार देण्यात आली आहे.

त्यावेळी मोरया प्रतिष्ठानच्या चेतना शिरीष ढोरे, अबोली मयूर ढोरे,नगरसेविका पूनम जाधव,मीनाक्षी ढोरे, स्नेहल जेरातेगी,शर्मिला ढोरे, कविता नखाते, ज्योती सुगराळे, मोना ढोरे, शितल ढोरे,नयना भोसले, कांचन ढमाले, सारिका धुमाळ, स्वाती चव्हाण, जयश्री, स्नेहल पाटील, जान्हवी ढोरे, सोनाली मोरे, सारिका शेजवळ, सुषमा, शितल ढोरे आरती कुंभार सह महिला सदस्या उपस्थिती होत्या.

- Advertisment -

You cannot copy content of this page