शासनाच्या शाळा पूर्व तयारी अभियानानिमित्त लो.न.पा.शिक्षण मंडळ उर्दू प्राथमिक विद्यालयात समारोपाचे आयोजन…

0
87

लोणावळा : लोणावळा नगरपरिषद शिक्षण मंडळ उर्दू शाळा क्र 3 भांगरवाडीच्या ” शाळा पूर्व तयारी” अभियानाला प्रारंभ करण्यात आला आहे.त्यानुसार दि.31 मार्च रोजी शाळेच्या वतीने भांगरवाडी ते लोणावळा जनजागृती रॅली काढण्यात आली. त्यामध्ये विध्यार्थ्यांनी शाळे बाबत व शिक्षणाबाबत जन जागृतीची प्रात्यक्षिके केली. त्यानिमित्ताने दुपारी विद्यालयाच्या आवारात पालक,विध्यार्थी व उपस्थित पाहुणे यांच्या समारोपाचे आयोजन करण्यात आले.

यावेळी उपस्थित पालकांना शिक्षक वर्गाकडून मार्गदर्शन करण्यात आले.अंगणवाडीतून इयत्ता पहिलीमध्ये येणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांची शारीरिक , बौद्धिक क्षमता तपासणी चाचणी घेण्यात येणार असून सर्व शिक्षक व पालकांच्या मदतीने ” शाळा पूर्व तयारी अभियान ” राबवण्यात येणार असल्याची माहिती यावेळी शिक्षक मोईन सर यांनी दिली.


विद्यार्थ्यांना पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे शासनाचे प्रयत्न असून शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या वाढविण्यासाठी ” शाळा पूर्व तयारी ” या अभियानाची सुरुवात केली असल्याचे शिक्षक वर्गाने सांगितले आहे.तसेच या अभियानात पालक व शिक्षकांच्या मदतीने विद्यार्थ्यांची शारीरिक , बौद्धिक क्षमता तपासणी केली जाईल त्याचा स्वतंत्र अहवाल तयार करून त्या निरीक्षणाद्वारे विद्यार्थ्यांवर विशेष लक्ष केंद्रीत करणार असल्याचे शिक्षक वर्गाकडून पालकांना मार्गदर्शन करण्यात आले.


“शाळा पूर्व तयारी अभियान” या आयोजित समरोपास प्रमुख पाहुणे म्हणून शबीर लालू शेख, रिजवान मुनीर शेख, खालिद अत्तार, बसीर सर, चांद बडबटी, रामचंद्र जगदाळे, शफी अत्तार, मोहम्मद हुसैन मनीयार, ताजुद्दीन शेख, जाकीर खलिफा, संजय कडू, फिरोज शेख, रहीम सय्यद, फिरोज मुल्ला, रहीम गणी शेख इत्यादी मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिलशाद कुरेशी, इरशाद धोटेकर मिस, शायदा तांबोळी मिस, युसूफ सर,मुख्याध्यापक लतिफ खान सर यांनी केले तर आभार प्रदर्शन सईद नल्लमंडू सर यांनी केले.