शिंदे घाटेवाडी येथील 125 महिलांना इ श्रम कार्डचे वाटप…

0
62

आंदर मावळ : अंदर मावळातील शिंदे- घाटेवाडी येथील महिलांना ई श्रम कार्ड चे वाटप करून नंदिनी बाळासाहेब खांडभोर यांनी समाजा पुढे निर्माण केला एक वेगळा आदर्श.

शासनाच्या विविध योजना सर्व सामान्य माणसांपर्यंत पोहचत नाही, प्रशासन पूर्ण तयारी करूनही तळा – गळा पर्यंत पोहचता येत नाही. केंद्र शासन व राज्य शासनाच्या अनेक योजना आहेत परंतु त्याचे प्रतेक भागात निवडक लाभार्थी आहेत. या योजना गावातील प्रत्येक कुटुंबा पर्यन्त पोहच्यासाठी गावातील तरुणाई ने हा उपक्रम हाती घेणे गरजेचे आहे.या संकल्पनेतून हा स्तुत्य उपक्रम अंदर मावळ मधील शिंदे- घाटेवाडी येथे राबवण्यात आला आहे.नंदिनी बाळासाहेब खांडभोर यांनी पुढाकार घेवून गावातील 125 महिलांचे ई श्रम कार्ड काढले त्यांचे वाटप घाटेवाडी येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदीरात मान्य वरांच्या हस्ते करण्यात आले..

पुरुष कामा निमित्ताने घराबाहेर असतात,शहराच्या ठिकाणी प्रवास करतात आणि स्वतःच सरकारी योजनेचा लाभ घेतात परंतु महीला घरी असल्यामुळे त्यांना सरकारी योजनेचा लाभ मिळत नाही. माझ्या गावातील प्रतेक कुटुंबा पर्यन्त सरकारी योजना पोहचविणार असे यावेळी बोलताना नंदिनी बाळासाहेब खांडभोर यांनी सांगितले.
या उपक्रमाचे सर्व स्तरावर कौतुक करण्यात येत आहे . प्रत्येकाने आपापल्या गावात असा उपक्रम घेण्यात यावा असे आवाहन यावेळी करण्यात आले आहे.

या वेळी शिवसेना तालुका प्रमुख राजुभाऊ खांडभोर, वडेश्वर गावचे सरपंच रवींद्र हेमाडे, ग्राम पंचायत सदस्य शिवराम शिंदे, व्याख्याते बाळासाहेब खांडभोर, दिपक खांडभोर, सुरेश खांडभोर, बजरंग खांडभोर, तसेच गावातील सर्व महीला उपस्थित होत्या.