Friday, June 9, 2023
Homeपुणेमावळशिक्षक संघाचे प्रसिद्धीप्रमुख सुहास विटे यांच्या वाढदिवसानिमित्त वेहेरगाव केंद्रातील पन्नास विध्यार्थ्यांना शैक्षणिक...

शिक्षक संघाचे प्रसिद्धीप्रमुख सुहास विटे यांच्या वाढदिवसानिमित्त वेहेरगाव केंद्रातील पन्नास विध्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप..

कार्ला (प्रतिनिधी):वेहेरगाव केंद्राचे केंद्रप्रमुख व राज्य शिक्षक संघाचे प्रसिद्धीप्रमुख सुहास विटे यांच्या वाढदिवसानिमित्त वेहेरगाव केंद्रातील 50 गुणवंत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
कार्ला येथील एकविरा विद्यालयात या निमित्त वेहेरगाव केंद्रातील 10 शाळांमधील विद्यार्थ्यांची इंग्रजी अध्ययन समृद्धी शब्दसंपत्तीवर आधारीत स्पर्धा घेण्यात आली. त्यातून प्राविण्य मिळविलेल्या 50 विद्यार्थ्यांना मावळ पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब राक्षे यांच्या हस्ते शैक्षणिक किटचे वाटप करण्यात आले. सुहास विटे यांचा वाढदिवसानिमत्त सत्कार करण्यात आला.
यावेळी शिक्षण विस्तार अधिकारी सुजाता शिंदे, मनोहर कुलकर्णी, शिवाजी थोरवे, शालिनीताई ढवळे, प्राचार्य कैलास पारधी, केंद्रप्रमुख मुकुंद तनपुरे, रघुनाथ मोरमारे, अजित नवले, शिवाजी जरग, मिनीनाथ खुरसुले, संघटनांचे पदाधिकारी शोभा वहिले, शिवाजी ठाकर, राजू भेगडे, मनोज भांगरे, गोरक्षनाथ जांभुळकर, अजित मोरे, संगिता शिरसाट, निर्मला काळे, वनिता पोंक्षे, संतोष म.गायकवाड, ज्ञानेश्वर शिवणेकर, संजय ठुले, मारुती लायगुडे, गुलाब दाभाडे, संदिप आडकर, कुंडलिक लोटे आदीजन उपस्थित होते.

You cannot copy content of this page