Thursday, June 1, 2023
Homeपुणेदेहूरोडशिलाटणे येथील शिवभक्तांच्या टेम्पोला धडक देणाऱ्या ट्रक चालक व क्लीनरला अटक…

शिलाटणे येथील शिवभक्तांच्या टेम्पोला धडक देणाऱ्या ट्रक चालक व क्लीनरला अटक…

देहूरोड (प्रतिनिधी): मल्हारगडावरून शिवज्योत घेऊन निघालेल्या शिवभक्तांच्या टेम्पोला ताथवडे येथे झालेल्या अपघाता प्रकरणी हिंजवडी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.
याबाबत सागर भागू कोंडभर (वय 34, रा. शिलाटणे, ता. मावळ) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून याप्रकरणी ट्रक चालक नामदेव विनायक पाटोळे (वय 36 ),व क्लिनर प्रशांत विकास बनसोडे (वय 26, दोघे रा. उमरगा, जि. उस्मानाबाद) या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्यासह ट्रक मालकाच्या विरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवजयंती निमित्त फिर्यादी आणि त्यांच्या गावातील शिवभक्त शिवज्योत आणण्यासाठी मल्हारगडावर गेले होते. तेथून शिवज्योत घेऊन शिलाटणे येथे येत असताना ताथवडे येथे शुक्रवार दि.10 रोजी पहाटे 4:30 वा.च्या सुमारास त्यांच्या टेम्पोला पाठीमागून नामदेव पाटोळे याच्या ताब्यातील ट्रकने धडक दिली. त्यात फिर्यादी यांच्या टेम्पोसोबत असलेले 32 जण जखमी झाले. ट्रकच्या धडकेमुळे टेम्पो चालकाचे नियंत्रण सुटले आणि टेम्पो समोरच्या दुचाकीला धडकला.
दुचाकीवरील दोघेजण जखमी झाले. या अपघातात एकूण 24 जण गंभीर जखमी झाले आहेत.अपघात घडल्यानंतर ट्रक मालकाने, आम्ही तुमच्या मुलांना काही मदत करणार नाही. तुम्हाला काय करायचे ते करा,अशी धमकी दिली. अपघातातील जखमींना तीन वेगवेगळ्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यावरून गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

You cannot copy content of this page