शिलाटाणे गावाजवळ कार व कंटेनरचा भीषण अपघात,, पाच जणांचा जागीच मृत्यू..

0
608

लोणावळा : मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गावर शिलाटणे गावाजवळ आज सकाळी कार व कंटेनरचा भिषण अपघात झाला .

या अपघातामध्ये कारमधील पाच जणांचा जागीच मृत्यू झाला असून कारचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे .

मिळालेल्या माहितीनुसार पुण्याच्या दिशेने भरधाव वेगात जाणारी कार कार्ला फाटा सोडल्यानंतर चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने रस्त्याच्या मध्ये असणारे दुभाजक ओलांडून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या कंटेनर खाली घुसल्याने हा भिषण अपघात झाला .

यामध्ये कारमधील सर्व प्रवाश्यांचा जागीच मृत्यू झाला . अपघाताची माहिती समजताच आयआरबी पेट्रोलिंग , देवदूत यंत्रणा , स्थानिक ग्रामस्त , पोलीस यंत्रणा यांनी घटनास्थळी धाव घेत कंटेनर खाली अडकलेली गाडी व प्रवाशी यांना बाहेर काढले . दरम्यान या घटनेमुळे मुंबईकडे जाणाऱ्या मार्गिकेवर प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती.