Tuesday, May 30, 2023
Homeमहाराष्ट्ररायगडशिल्पकार साहित्य कला मंडळातर्फे दिवंगत गुरुवर्य पी.ए. उर्फ जीवन घोडके स्मृती दिनाचे...

शिल्पकार साहित्य कला मंडळातर्फे दिवंगत गुरुवर्य पी.ए. उर्फ जीवन घोडके स्मृती दिनाचे आयोजन !

भिसेगाव – कर्जत ( सुभाष सोनावणे ) ” गुरू तेच जे सर्व कलेत , पारंगत असतात ” अश्या गुरुप्रती आपली दृढ भावना – आपली निष्ठा – आपले प्रेम अधिक घट्ट होण्यासाठी त्यांच्या कार्याचे चिंतन – मनन करणे हिच त्यांच्यासाठी आदरांजली ठरते , म्हणूनच महाराष्ट्रातील तथा रायगड जिल्ह्यातील नामांकित शिघ्र कवी , साहित्यरत्न आणि शिल्पकार साहित्य कला मंडळाचे संस्थापक अध्यक्ष दिवंगत गुरुवर्य पी.ए . उर्फ जीवन घोडके यांचा द्वितीय स्मृती दिन मंगळवार दि. २३ मे २०२३ रोजी कर्जत तालुक्यातील मोठे वेणगाव येथे साजरा होत आहे. या निमित्ताने प्रबोधनपर सांस्कृतीक कार्यक्रमाचे आयोजन करण्यांत आले आहे. या कार्यक्रमास अनेक मान्यवर उपस्थित रहाणार असून सर्व बहुजन वर्गाने व कला क्षेत्रातील कलावंतांनी उपस्थित रहाण्याचे आवाहन शिल्पकार साहित्य कला मंडळाचे अध्यक्ष अशोकदादा सोनावणे व घोडके परिवाराने केले आहे.

यावेळी मंगळवार दि. २३ मे २०२३ रोजी सायंकाळी ७.३० वाजता मोठे वेणगाव येथे सभा होणार असून मान्यवरांचे मार्गदर्शन तसेच रात्री ९.३० वाजता शिल्पकार साहित्य कला मंडळाचे (सभासद) कलावंताचा प्रबोधनात्मक गित गायनाचा कार्यक्रम होईल.
या कार्यक्रमास प्रमुख अतिथी मा. नॅन्सीताई गायकवाड – जागृती कष्टकरी संघटना नेत्या , मा. ललिताताई गायकवाड – सचिव आम आदमी पार्टी महाराष्ट्र , मा. उत्तमभाई जाधव – प्रथम उपनगराध्यक्ष तथा एस. आर. पी. रायगड जिल्हा अध्यक्ष , मा. राहुल डाळींबकर – आर. पी. आय. जेष्ठ नेते तथा नगरसेवक , मा. प्रभाकर गोतारणे – एस. आर. पी. कर्जत ता. अध्यक्ष , मा. शरद भागा मोरे – सामाजिक कार्यकर्ते , मा. सुरेश सोनावळे – सामाजिक कार्यकतें , ऍड. गोपाळ शेळके – नामांकित वकील ,मा. मारूतीदादा गायकवाड – आर.पी.आय. नेते , मा. लक्ष्मण बंधू अभंगे – जेष्ठ साहित्यीक , मा. उमेश गायकवाड – नगरसेवक कर्जत न.प. , पत्रकार विद्यानंद ओव्हाळ , मा. धर्मानंद गायकवाड – आर.पी.आय. नेते तथा पत्रकार , मा. राजेंद्र श्रीराम – सामाजिक कार्यकर्ते, किशोर गायकवाड – आर.पी.आय नेते , दिपक भागा मोरे – माजी नगरसेवक , गुलाब शिंदे – सामाजिक कार्यकर्ते , प्रफुल्ल सुर्वे, जनार्दन खंडागळे , भाई जगन्नाथ ओव्हाळ – जेष्ठ पत्रकार , संजय जाधव , पांडुरंग भालेराव , सुभाष गायकवाड – जेष्ठ पत्रकार , रामचंद्र सोनावणे – जेष्ठ गायक , सुरेश रोकडे – सामाजिक कार्यकर्ते बदलापूर , प्रमुख ग्रामस्थ संजय गवळे अध्यक्ष – भिम गर्जना मित्र मंडळ, मोठे वेणगांव , उत्तम सोनावणे – मा. अध्यक्ष भिम गर्जना मित्र मंडळ , सुभाष गवळे – मा. समाजकल्याण सभापती रायगड जिल्हा परिषद , मोहन ढोले- शिवसेना शाखा प्रमुख , रविंद्र सोनावणे – बौध्दाचार्य , बाळाराम ढोले , अनिल विनायक गवळे , दिपक पंडीत , सदाशिव रातांबे , भगवान ज्ञान पंडीत , विजय बाबुराव शिंदे , उपासक सुदाम गवळे , सुभाष मोरेश्वर जाधव – उपासक श्रामणेर अनिल गवळे – जेष्ठ पत्रकार , मधुकर मारुती जाधव , उत्तम जनार्दन जाधव – शिवसेना उप शाखा प्रमुख , रमेश गणपत गवळे , विजय ढोले , गायक चंद्रकांत रामचंद्र जाधव , गणेश हाशा जाधव आदी उपस्थित रहाणार आहेत.

तरी या शिल्पकार साहित्य कला मंडळाचे संस्थापक अध्यक्ष कलारत्न दिवंगत गुरुवर्य पांडुरंग उर्फ जीवन घोडके यांच्या द्वितीय स्मृती दिन कार्यक्रमास सर्वांनी उपस्थित रहावे , असे आयोजक अशोकदादा सोनावणे – अध्यक्ष , नानासाहेब साळुंके – उपाध्यक्ष , बाळाराम जैतु ढोले – सचिव ,भगवान भागा यादव – उप सचिव ,जयवंत जाधव – खजिनदार , मोहन ढोले , महेंद्र गायकवाड , दामोदर गायकवाड , नरेश जाधव , वामन शिंदे , छाया भालेराव , नागेश गवळे , कमलाकर जाधव , संतोष जाधव , विक्की जाधव आणि घोडके परिवाराचे प्रेरणा , अभिनय, अश्विनी , प्रगती, प्रणित, सुमन पांडुरंग घोडके , सचिन भालेराव, लुकेश प्रभाकर सुर्वे आदींनी आवाहन केले आहे.

You cannot copy content of this page