शिवजयंती निमित्त खंडाळा येथे विविध क्षेत्रातील कर्मचाऱ्यांचा गौरव…

0
100

लोणावळा : आदर्श मित्र मंडळ रेल्वे चाळ खंडाळा व रोहिदास तरूण मंडळ खंडाळा यांच्या संयुक्त सहकार्याने खंडाळ्यात शिवजयंती साजरी करण्यात आली . अंगणवाडी शिक्षिका छाया बनसोडे व सुचिता गायकवाड यांच्या हस्ते महाराजांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले . यावेळी खंडाळा पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक प्रदिप चौधरी यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज प्रतिमेस तर परेश बडेकर याच्या हस्ते डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला . राजु जाधव यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले , भरत चव्हाण यांनी श्रीफळ वाढविले.


यावेळी कोरोनाच्या काळात ज्यांनी चांगली कामगिरी केली असे लोणावळा नगरपरिषदचे सफाई कामगार व सरकारी हॉस्पिटलचे कर्मचारी या सर्वांना सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात आले . शिवजयंती उत्सव मित्र मंडळ खंडाळा शिवज्योतीचे स्वागत सर्व महिलांनी व नितीन काळे यांनी केले .

यावेळी माजी नगरसेवक भालचंद्र खराडे , रेल्वे स्टेशन मास्तर रजपूत , मनिष पवार , मंगेश येवले , गणेश वाडेकर , किरण गायकवाड , अजय दळवी , संतोष गोणते , विश्वनाथ डांबरे , अभय दिघे , लोकेश पवार , सागर गोरेगांवकर , कुंदन पटेकर , ऋतिक शिळवणे , संदेश मानकर , प्रणव गायकवाड , महेश येवले , संतोष वाळके आदी मान्यवर उपस्थित होते . कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सुरेश भ . गायकवाड यांनी केले तर सर्वांचे आभार संतोष फाटक यांनी मानले .