Thursday, June 1, 2023
Homeपुणेमावळशिवजयंती निमित्त गड किल्यांवरून येणाऱ्या शिवज्योती आणि शिवभक्तांचे स्वागत व अल्पोपहाराचे कार्ल्यात...

शिवजयंती निमित्त गड किल्यांवरून येणाऱ्या शिवज्योती आणि शिवभक्तांचे स्वागत व अल्पोपहाराचे कार्ल्यात युवासेनेकडून नियोजन…

कार्ला (प्रतिनिधी):छत्रपती शिवाजी महाराजांच्या तिथी नुसार साजऱ्या होणाऱ्या शिवजयंती निमित्त लोहगड विसापूर किल्यावर शिवज्योत घेऊन महाराष्ट्रातील हजारो शिवभक्त आले होते.या ऐतिहासिक कार्ला नगरीत शिवज्योतींचे व शिवभक्ताचे उत्साहात स्वागत करण्यात आले.तसेच या शिवभक्तांसाठी अल्पोपाहाराचे आयोजन करण्यात आले होते.मावळ तालुका शिवसेनेचे युवा सेना तालुकाप्रमुख विशाल भाऊसाहेब हुलावळे यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
सलग दहा वर्षे या उपक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे.तत्पूर्वी शिवप्रतिमेचे पुजन करून कार्यक्रमास सुरुवात झाली.शिवज्योतींचे स्वागत करण्यासाठी व अल्पोपाहार वाटप करण्यासाठी भाऊसाहेब हुलावळे,कार्ला सोसायटी संचालक दत्तात्रय हुलावळे, ग्रामपंचायत सदस्य सचिन हुलावळे,सनी हुलावळे,माजी सरपंच सागर हुलावळे,भाजपा विद्यार्थी संघटनेचे मा.अध्यक्ष समीर हुलावळे, मा.चेअरमन सुखदेव हुलावळे, सतिश मोरे,पोलिस पाटील संजय जाधव,मा.सदस्य सुरेश जाधव, युवासेना उपतालुकाप्रमुख नितिन देशमुख,कंरडोलीचे शाखाप्रमुख खंडु शेलार,मनसेचे गण प्रमुख सुनिल सावळे, अमोल हुलावळे, अनिल हुलावळे, संतोष हुलावळे,स्वप्नील दळवी,विनोद हुलावळे, मंगेश हुलावळे,भरत हुलावळे,सुनिल हुलावळे, उपशाखाप्रमुख विशाल वसंत हुलावळे, बाबाजी सोंडेकर,संदेश हजारे, सचिन वाडेकर,नंदु सोंडेकर,माऊली हुलावळे,आकाश हुलावळे,राजु सावळे,बाळु हुलावळे,रामदास सुतार, ओंकार हुलावळे, प्रसाद शिंदे ,अक्षय हुलावळे, आदेश हुलावळे, सचिन भीम हुलावळे, दिनेश किसन हुलावळे,मितिष हुलावळे आदी जण उपस्थित होते.

You cannot copy content of this page