Monday, July 22, 2024
Homeमहाराष्ट्ररायगड" शिवभक्त नदीम भाई खान यांना " महाराष्ट्र आयकॉन अवॉर्ड्स - २०२४...

” शिवभक्त नदीम भाई खान यांना ” महाराष्ट्र आयकॉन अवॉर्ड्स – २०२४ ने सन्मानित !

भिसेगाव – कर्जत ( सुभाष सोनावणे ) आपण ही या समाजाचे काही देणे आहोत , हे उद्दात धोरण अंगिकारून आपण करत असलेली सामाजिक सेवा , जनतेची मदत , ” अटकेपार जावून ” या कार्याची दखल कुणी घेईल , असे स्वप्नातही न वाटल्याने आजचा हा युवा महाराष्ट्र फाउंडेशन आयोजित ” महाराष्ट्र आयकॉन अवॉर्ड्स – २०२४ ” या सर्वोच्च पुरस्काराचा मानकरी मी नसून ज्यांचे विचार घेवून मी पुढे पाऊल टाकतो , ते महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज , भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर , ज्यांची प्रेरणा घेवून मी कार्य करतो ते शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे , धर्मवीर आनंद दिघे साहेब , ज्यांच्या मुशीत मी वाढलो ते कर्जतचा ढाण्या वाघ अनंत काका जोशी , माझे ” प्रेरणास्थान कार्यसम्राट आमदार महेंद्र शेठ थोरवे ” , माझे जन्मदाते माझी आई , वडील , नेहमीच सारथी सारखे बरोबर असणारा माझा मित्र परिवार , माझ्या प्रत्येक कार्यात सावली सारखी असणारी माझी पत्नी , माझा मुलगा , सर्व खान कुटुंब आणि तमाम कर्जतकर नागरिकांना मी हा पुरस्कार समर्पित करतो , असे भावपूर्ण मत ” शिवभक्त नदीम भाई युसुफ खान ” यांनी व्यक्त केले.

आज शुक्रवार दिनांक २८ जून २०२४ रोजी पंडीत जवाहरलाल नेहरु सभागृह घोले रोड , शिवाजीनगर , पुणे येथे सामाजिक कार्यात अटकेपार कार्य करून अविरत समाजाची सेवा करणारे शिवभक्त नदीम भाई युसुफ खान यांना ” महाराष्ट्र आयकॉन अवॉर्ड्स – २०२४ ” हा सर्वोच्च पुरस्कार बिपीन सुर्वे (अभिनेता सुबेदार चित्रपट) , अवधुत गांधी (गायक शिवबा राज) , मेघा धाडे (मराठी बिग बॉस फेम) , आरती शिंदे (अप्पी आमची कलेक्टर फेम) यांच्या शुभहस्ते त्याचप्रमाणे अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत सन्मानपत्र – सन्मान चिन्ह – सन्मान पदक देवून सन्मानित करण्यात आले.

आज कर्जत शहरात मी एका मुस्लिम समाजाचा असूनही मला शिवसेना पक्षात ज्यांनी घडविले ते ” माझे प्रेरणास्थान कार्यसम्राट आमदार महेंद्र शेठ थोरवे ” यांनी प्रत्येक कार्यात सेवा करण्याचे बळ देवून मार्गदर्शन करतात , त्यांचे अविरत प्रेमामुळेच व राजकीय शक्तिमुळेच मी इथवर पोहचलो असून हा सर्वोच्च पुरस्कार मिळण्यासाठी त्यांची साथ मला कायम लाभली , असे गौरोद्गार त्यांनी व्यक्त केले.

त्यांना मिळालेल्या या सर्वोच्च पुरस्कारामुळे त्यांच्यावर राजकीय – शैक्षणिक – सामाजिक – धार्मिक – सांस्कृतिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील यशस्वी कार्य करण्यास प्रेरणादायी शुभेच्छा दिल्या आहेत.
- Advertisment -

You cannot copy content of this page