शिवभक्त विजय तिकोणे आयोजित मंगळसूत्र, खेळ रंगला पैठणीचा या कार्यक्रमास महिलांचा उदंड प्रतिसाद…

0
328

मळवली : जागतिक महिला दिनानिमीत्त कुसगाव – वरसोली गणातील महिलांसाठी शिवभक्त विजय तिकोणे यांच्या वतीने मंगळसुत्र अर्थात खेळ रंगला पैठणीचा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

सादरकर्ते विनोदजी शिंदे आणि टीम मुंबई यांनी हा कार्यक्रम अतिशय उत्तम प्रकारे रेन्बो टीम सह पार पाडला यावेळी चुल आणि मुल यातुन वेळ काढत महिलांनी मनसोक्त या कार्यक्रमाचा आनंद लुटला व तो आनंद प्रत्येक महिला भगिनींच्या चेहऱ्यावर दिसून आला यावेळी महिलांचा उदंड प्रतिसाद लाभला होता .

आयोजित कार्यक्रमात प्रथम क्रमांकाच्या मानकरी सौ. मालताताई विलास केदारी या ठरल्या असून त्यांनी सोन्याचे मंगळसूत्र जिंकले आहे. तसेच द्वितीय क्रमांकाच्या पैठणीच्या मानकरी सौ. अश्विनीताई मनिष फाटक तर तृतीय क्रमांकाच्या सोन्याच्या नथ ही जिंकली आहे सौ. अर्चनाताई योगेश येवले यांनी. त्याच बरोबर लक्की ड्रॉ मध्ये चांदीच्या छल्याच्या प्रथम लक्की ड्रॉ सौ. कविताताई बाळु गायकवाड व लेडिज घड्याळाच्या द्वितीय क्रमांकाच्या लक्की ड्रॉ सौ. सुरेखाताई राजु पिंपळे या ठरल्या आहेत. अतिशय आनंदमय व उत्साही वातावरणात हा कार्यक्रम पार पडला.

यावेळी प्रमुख अतिथी गुरुवर्य अमलेशभाऊ जवळेकर तसेच तमाम शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक मोठया संख्येने उपस्थित होते. सर्व उपस्थितांचे व स्पर्धकांचे आयोजक शिवभक्त विजय तिकोणे यांनी मनापासुन आभार मानले.