शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे लोणावळा शहराचे ऋणानुबंध..

0
471

कार्ला प्रतिनिधी
लोणावळा शहरातील जेष्ठ समाजसेवक, दुर्गप्रेमी विष्णू गायकवाड यांनी बाबासाहेबांसोबत मावळ परिसरातील दुर्गम किल्ले भ्रमंती केली.बाबासाहेबांच्या प्रेरणेने किल्ले संवर्धन या हेतूने १९८० साली लोणावळा शहरात शिवदुर्ग मित्र या संस्थेची स्थापन करण्यात आली. लोणावळा शहरात गायकवाड कुटुंबीय व बाबासाहेबांचे अतिशय जिव्हाळ्याचे संबंध होते.

नंतर विष्णू गायकवाड यांचे चिरंजीव सुनील गायकवाड यांनी तो ऋणानुबंध कायम ठेवला व बाबासाहेबांच्या मार्गदर्शनाखाली शिवदुर्ग मित्र या संस्थेच्या मार्फत अनेक समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात आले आहेत.अनेक राज्यतरीय, राष्ट्रीय पुरस्कार संस्थेला मिळाले आहेत यामागील अनमोल मार्गदर्शन बाबासाहेबांचे मिळत गेले.आज लोणावळा शहरासह ग्रामीण भागातील असंख्य तरुण शिवदुर्ग मित्र संस्थेत कार्यरत आहेत.

अनेक धाडसाचे उपक्रम संस्थेतर्फे राबविण्यात येतात. रेस्क्यू साठी महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी दर्याखोऱ्यात जाऊन रेस्क्यू ऑपरेशन संस्थे मार्फत केले जाते. यामागील प्रेरणा बाबासाहेबांची आहे. अशी प्रत्येकाची भावना आहे बाबासाहेबांच्या गेल्याचे दुःख अनेकांनी व्यक्त केले आहे. लोणावळा शहरात येणाऱ्या असंख्य पर्यटकांमध्ये भुशी डॅम लोणावळा लेक पवना डॅम या परिसरामध्ये अनेक पाण्यात बुडून मृत्यू होतात.

त्यांना वाचवण्याचं काम शिवदुर्ग संस्थेमार्फत करण्यात येते.बाबासाहेबांच्या प्रेरणेने २००९ साली शिवदुर्ग संस्थेमार्फत रायगड जिल्ह्यातील उंबरखेड येथे ऐतिहासिक विजयाचे प्रतीक म्हणून विजय स्तंभ उभारण्यात आला आहे.बाबासाहेब लिखित जाणता राजा या प्रयोगाच्या निमित्ताने शिवदुर्ग मित्र मंडळ व बाबासाहेब यांचे सतत ऋणानुबंध जुळत गेले त्या आठवणी सुनील गायकवाड यांनी व्यक्त केल्या.


लोणावळा शहरातील तरुण शिवप्रेमी प्रवीण देशमुख यांनी यांनी बाबासाहेबांच्या प्रेरणेतून व मार्गदर्शनाने मराठ्यांची गौरवगाथा हे महानाट्य लिहिले.मराठ्यांची गौरवगाथा महानाटकाचे उदघाटन बाबासाहेबांच्या हस्ते वलवण येथील हॉटेल वलवण विलेज येथे झाले.उद्घाटन प्रसंगी बाबासाहेबांनी मराठ्यांची गौरवगाथा हे महानाट्य म्हणजे शिवधनुष्य आहे ते तरुणांनी पेललं पाहिजे आशा भावना व्यक्त केल्या.

पेलण्याची प्रेरणा बाबासाहेबांमुळे निर्माण झाली मावळ मुंबईसह अनेक ठिकाणी जाणता राजा सारखे भव्य दिव्य देखाव्या सह मराठ्यांची गौरवगाथा नाटकांचे प्रयोग यशस्वी झाले.आज बाबासाहेब आमच्यात नाहीत ही कल्पनाच करवत नाही. अशा प्रकारच्या भावना आमच्या प्रतिनिधीकडे प्रवीण देशमुख यांनी व्यक्त केली.


(लोणावळा येथे शिवशाहीर बाबासाहेब यांना लोणावळा नागरपरिषेच्या अध्यक्ष सुरेखा जाधव व प्रवीण देशमुख यांच्या हस्ते सन्मान)