Friday, June 9, 2023
Homeपुणेलोणावळाशिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या गडचिरोली जिल्हा संपर्कप्रमुख पदी महेश गोपाळ केदारी...

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या गडचिरोली जिल्हा संपर्कप्रमुख पदी महेश गोपाळ केदारी यांची नियुक्ती…

लोणावळा (प्रतिनिधी): लोणावळ्यातील युवानेते व महाराष्ट्र वाहतूक सेना पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष महेश गोपाळ केदारी यांची गडचिरोली जिल्हा संपर्कप्रमुख पदी नियुक्ती झाली आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकातून ही माहिती देण्यात आली. यापूर्वी त्यांनी मेहकर (बुलढाणा), मलकापूर विधानसभा संपर्क प्रमुख पदाची जबाबदारी यशस्वीपणाने पार पाडली आहे. सोबतच अनेक ठिकाणी निवडणूक निरीक्षक म्हणून कामकाज पाहिले आहे.तर महाराष्ट्र वाहतूक सेना पुणे जिल्हा पदावर देखील त्यांनी अनेक वर्ष काम केले आहे.
शिवसेना व ठाकरे परिवाराशी एकनिष्ठ रहात पक्ष वाढीसाठी केलेल्या कार्याची दखल घेत पक्ष श्रेष्टीकडून विविध जबाबदाऱ्या सोपविल्या जात असतात,आणि आजपर्यंत दिलेल्या जबाबदाऱ्या मी पार पाडण्याचा पुर्ण क्षमतेने प्रयत्न केला असून ही जबाबदारी देखील पुर्ण जबाबदारीने पुर्ण करेल असा विश्वास महेश केदारी यांनी व्यक्त केला.

You cannot copy content of this page