Monday, July 22, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडशिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षात अनेकांचा पक्ष प्रवेश !

शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षात अनेकांचा पक्ष प्रवेश !

भिसेगाव – कर्जत ( सुभाष सोनावणे ) येणाऱ्या लोकसभा – विधानसभा व कर्जत नगर परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ” शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे ” या पक्षाचे उपजिल्हाप्रमुख नितीन दादा सावंत आपल्या पक्षाचा झेंडा चिरकाल डौलाने फडकत रहावा , यासाठी कंबर कसत असून इंडिया आघाडीचे उमेदवार संजोगभाऊ वाघेरे पाटील यांचे हात मजबूत करण्यासाठी व बहुसंख्येने विजयी होण्यासाठी चांगलीच ” फिल्डींग ” लावून अनेकांचा पक्ष प्रवेश करून शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्ष देखील ” काही कमी नाही ” , असा चपराक विरोधी पक्षाला देत आहेत . आज शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख नितीनदादा सावंत यांच्या कार्य प्रणाली वर विश्वास ठेवून कर्जत नगर परिषद हद्दीतील गुंडगे प्रभागातील अनेक कार्यकर्त्यांचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात पक्ष प्रवेश झाला . त्यामुळे गुंडगे प्रभागाला खिंडार पडले असून शिवसेना पक्ष मजबूत झाला आहे.

आज ” शिवालय ” या शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या संपर्क कार्यालयात कर्तृत्ववान – डॅशिंग उपजिल्हाप्रमुख नितीन दादा सावंत यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून त्यांच्या प्रमुख उपस्थितीत बाळा ठाकरे , किशन कासुरडे , प्रतिक कदम , रोहन कदम , अलपेश शिंदे , किशोर राठोड , ओम शिंदे , अजय दाभणे , सुजत सोनावणे , प्रतीक मोरे , रोहित मोरे , ओम दळवी , सचिन नायकर , अजान शेख , विवेक पडवळ , संभाजी सोनावणे , संकेत परदिसे , रणजित देसाई , समिर पारधी , साहिल मोरे , मनिष गोटमारे , चैतन्य मोहिते आदी कार्यकर्त्यांनी यावेळी कर्जत तालुका प्रमुख उत्तमशेठ कोळंबे, कर्जत शहरप्रमुख निलेश बाळू घरत , मा.पंचायत समिती सभापती पंढरीनाथ राऊत , उपशहर प्रमुख महेंद्र कानिटकर , सहसंपर्क प्रमुख विनोद पांडे , विभाग प्रमुख जगदीश दिसले , प्रशांत दिघे , योगेश थोरवे , वैभव पेठ ,दिनेश देशमुख उपतालुका संघटक , यांच्या प्रमुख उपस्थितीत पक्षप्रवेश करण्यात आला.यावेळी पक्षात सर्वांना न्याय दिला जाईल , असा विश्वास उपजिल्हाप्रमुख नितीन दादा सावंत यांनी व्यक्त केला.
- Advertisment -

You cannot copy content of this page