Friday, June 9, 2023
Homeमहाराष्ट्ररायगडशिवसेना कर्जत उपशहरप्रमुख पदी प्रमोद नाना खराडे यांची नियुक्ती !

शिवसेना कर्जत उपशहरप्रमुख पदी प्रमोद नाना खराडे यांची नियुक्ती !

उपजिल्हाप्रमुख नितीन दादा सावंत यांच्या नेतृत्वाखाली पक्ष वाढविणार – प्रमोद खराडे..

भिसेगाव- कर्जत ( सुभाष सोनावणे ) हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने तसेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे व युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या आदेशाने , शिवसेना रायगड जिल्हा संपर्कप्रमुख बबनदादा पाटील , जिल्हाप्रमुख मनोहरशेठ भोईर व उपजिल्हाप्रमुख तथा कर्जत न. प.चे जेष्ठ नगरसेवक नितीन दादा सावंत यांच्या सूचनेनुसार शिवसेना कर्जत उपशहरप्रमुख पदी मुद्रे ( खुर्द ) येथील कट्टर शिवसैनिक प्रमोद नाना खराडे यांची नियुक्ती नुकतीच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे संपर्क कार्यालय ” शिवालय ” येथे तालुका प्रमुख उत्तम कोळंबे यांनी केली.
यावेळी उपजिल्हाप्रमुख नितीन दादा सावंत ,नगराध्यक्षा तथा जिल्हा महिला संघटक सौ. सुवर्णा जोशी , कर्जत ता.प्रमुख उत्तम कोळंबे तसेच शिवसेनेचे सर्व पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.कर्जत नगर परिषद हद्दीत मुद्रे ( खु ) येथे रहाणारे प्रमोद नाना खराडे हे तरुण पणापासून शिवसेनेचे कट्टर शिवसैनिक आहेत . हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने प्रेरित होऊन शिवसेनेमध्ये शिवसैनिक म्हणून प्रामाणिकपणे काम करत असताना सुरुवातीच्या काळात शिवसैनिक म्हणून नागरिकांच्या अनेक समस्या सोडवण्याची धडपड कर्जतमध्ये केली.अनेक आंदोलन , मोर्चे , समस्यांना वाचा फोडण्यासाठी ते नेहमीच अग्रेसर राहिले , हिच त्यांची धडाडी बघून कालांतराने त्यांना मुद्रे खुर्द शाखाप्रमुख पद देण्यात आले.
याकाळात देखील त्यांनी अनेक कामे केली , आपल्या प्रभागातील नागरिकांच्या समस्या , व्यायाम शाळेचा प्रश्न , छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाचा प्रश्न , उल्हास नदी स्वच्छता , स्मशानभूमी , रस्ते , पाणी , यामध्ये त्यांची मुख्य भूमिका राहिली.तरुणांना मैदानी खेळाची आवड असावी म्हणून कबड्डी खेळाला प्राधान्य देत तरुणांचा कबड्डी संघ तयार केला व प्रमोद खराडे यांनी मुद्रे खुर्द कबड्डी संघाचे अध्यक्षपद देखील भूषवले. कोरोनाच्या काळामध्ये अनेक नागरिकांना घरपोच गरजेच्या वस्तू पोहोचविले , यावेळी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता हे काम केले.
त्यांच्या या धडाडीच्या कार्याची पोच पावती म्हणून शिवसेना पक्षप्रमुख व उपजिल्हाप्रमुख नितीन दादा सावंत यांनी पक्ष वाढीसाठी डॅशिंग शिवसैनिक व सर्वांना मदतीला धावणारे प्रमोद नाना खराडे यांची कर्जत उपशहरप्रमुख पदी नेमणूक करण्यात आली.कर्जत उपशहरप्रमुख पदी प्रमोद नाना खराडे यांची नियुक्ती झाल्याबद्दल त्यांच्यावर कर्जत शहर , परिसर व मुद्रे येथून अनेकांनी अभिनंदन करून शुभेच्छा व्यक्त केल्या.

You cannot copy content of this page