Tuesday, May 30, 2023
Homeमहाराष्ट्ररायगडशिवसेना चषक २०२३ चे कडाव येथे ओव्हरम क्रिकेटच्या भव्य स्पर्धा !

शिवसेना चषक २०२३ चे कडाव येथे ओव्हरम क्रिकेटच्या भव्य स्पर्धा !

जय हनुमान क्रिकेट संघ बार्डी यांच्या तर्फे आयोजन !

भिसेगाव- कर्जत ( सुभाष सोनावणे ) कर्जत तालुक्यातील कडाव येथे जय हनुमान क्रिकेट संघ बार्डी यांच्या तर्फे ” शिवसेना चषक – २०२३ ” चे भव्य आयोजन शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख नितीन दादा सावंत यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली ओव्हरम क्रिकेट स्पर्धा शुक्रवार दि. ३० डिसेंबर २०२२ ते सोमवार दि. ०२ जानेवारी २०२३ रोजी बार्डी – कडाव येथील भव्य मैदानात आयोजित करण्यात आले आहेत .या स्पर्धेत प्रथम पारितोषिक ३० हजार व आकर्षक चषक , दुसरे बक्षीस १५ हजार व आकर्षक चषक , तृतीय ७५०० रुपये व आकर्षक चषक , चतुर्थ पारितोषिक ७५०० रुपये व आकर्षक चषक ठेवण्यात आले असून प्रवेश फि ३५०० रुपये आहे.
उत्कृष्ट फलंदाज व गोलंदाज यांना आकर्षक चषक तर प्रत्येक सामन्यातील मॅन ऑफ द मॅच खेळाडूला आकर्षक चषक देऊन सन्मानित करण्यात येणार आहे , व मालिकाविरास आकर्षक फॅन बक्षीस मिळणार आहे.शिवसेना शाखा बार्डी , जय हनुमान क्रिकेट संघ आयोजित भव्य ओव्हरम क्रिकेट सामन्याचे उदघाटन कर्जत तालुका शिवसेना संघटक ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) सुदाम दादा पवाळी यांच्या शुभहस्ते मैदानाचे पूजन , तसेच छत्रपती शिवरायांच्या मूर्तीला पुष्पहार व शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले.
यावेळी अजय लक्ष्मण कराळे ( युवा सेना समन्वयक उमरोली पंचायत समिती ) , सरदार राघो कांबरी , दिलीप सटु कोळंबे , ललित लोभी , करण कांबरी , निलेश कांबरी , अविनाश कांबरी , त्याचप्रमाणे ग्रामस्थ मंडळ बार्डी व अनेक क्रिकेट शौकीन यावेळी उपस्थित होते . पंचांच्या भूमिकेत मिलिंद कोळंबे , प्रल्हाद कांबरी , किशोर रूठे असणार आहेत . तर या ओव्हरम क्रिकेट सामन्याचे थेट लाईव्ह प्रक्षेपण दाखवण्यात येणार आहेत.
पंचांचा निर्णय अंतिम असणार आहे , प्रथम येणाऱ्या ३२ संघांना प्रवेश दिला जाईल , ऍडव्हान्स फी १५०० रुपये दिल्याशिवाय संघ स्वीकारला जाणार नाही , सामने एक गाव ११ खेळाडू खेळवले जातील , उशिरा येणाऱ्या संघास २ धावांची पेनल्टी दिली जाईल , सामना कंपल्सरी चेसिंग असणार आहे , सामन्यात फेरबदल करण्याचा अधिकार कमिटीचा राहील , सामने हे ठीक सकाळी साडेनऊ वाजता कडाव येथील भव्य मैदानावर सुरू होतील , यासाठी संपर्क मिलिंद कोळंबे – 93 56 08 41 25 , सरदार कांबरी – 93 25 40 60 99 किशोर रुठे – 93 09 12 90 78 , अविनाश कांबरी – 86 05 83 53 10 यावर संपर्क साधण्याचे आवाहन जय हनुमान क्रिकेट संघ बार्डी – शिवसेना चषक २०२३ च्या आयोजकांनी केले आहे.

You cannot copy content of this page