Monday, January 20, 2025
Homeमहाराष्ट्ररायगडशिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांचे नेतृत्व " योग्य दिशा देणारे "-भावी...

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांचे नेतृत्व ” योग्य दिशा देणारे “-भावी खासदार संजोग वाघेरे पाटील..

येथील समस्या न सोडविणार्यांना त्यांची ” जागा दाखवा ” , शिवसैनिकांना केले आवाहन..

भिसेगाव – कर्जत ( सुभाष सोनावणे ) शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांच्यावर विरोधी पक्षाने खूप मोठ्या प्रमाणात आघात केले , आरोप केले , पक्ष फोडण्याचे काम केले तरीही आज ते स्वाभिमानाने ताठ उभे असून तेच नेतृत्व ” योग्य दिशा देणारे ” नेतृत्व असून आपण सर्व त्यांच्या पाठीशी ठाम उभे राहून आगामी लोकसभेच्या निवडणुकीत त्यांनी मला या मावळ लोकसभा मतदार संघातून उमेदवारी देवून नेतृत्व करण्याची संधी दिली असून आपण सर्व आपल्या गावात – प्रभागात – शहरात जोमाने काम केल्यास आपला ” विजयी ” मोठ्या संख्येने होईल , अशी ग्वाही आज मावळ लोकसभा मतदार संघातून शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे व महाआघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांनी कर्जत शहरातील शिवसेनेचे संपर्क कार्यालय ” शिवालय ” येथून आयोजित केलेल्या कर्जत – खालापूर तालुक्यातील पक्ष पदाधिकारी व शिवसैनिकांच्या बैठकीत आपले मत व्यक्त केले.

यावेळी यावेळी शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख नितीन सावंत, कर्जत तालुका प्रमुख उत्तम कोळंबे , खालापूर तालुका प्रमुख एकनाथ पिंगळे , जिल्हा महिला संघटक सुवर्णा जोशी , महिला तालुका संघटक करुणा बडेकर , कर्जत तालुका संघटक बाबू घारे , तालुका संघटक सुमन लोंगले , तसेच आवेश जुवारी , उप तालुका प्रमुख सुरेश गोमारे , प्रमोद सुर्वे , माजी सभापती प्रदीप ठाकरे , माजी उप सभापती पंढरीनाथ राऊत , युवा सेनेचे प्रथमेश मोरे , संपत हडप , सुरेश बोराडे , नितीन धुळे , माधव कोळंबे मा. सरपंच प्रमिला बोराडे , त्याचप्रमाणे दोन्ही तालुक्याचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.


यावेळी मार्गदर्शन करताना त्यांनी मावळ लोकसभा मतदार संघ हा ओरिजनल शिवसेनेचा बालेकिल्ला असून हा मतदार संघ अस्तित्वात आल्यापासून येथे शिवसेनेचे प्राबल्य आहे . मात्र येथून आपण निवडून दिलेल्या उमेदवाराने आपल्या समस्या १० वर्षे ” जैसे – थे ” ठेवून नेहमीच ” पाठ ” दाखवण्याचे काम केले असून येणाऱ्या निवडणुकीत ” त्यांची जागा ” त्यांना दाखवून देण्याचे आवाहन देखील भावी खासदार संजोग वाघेरे पाटील यांनी केले . ज्येष्ठ नागरिकांचे प्रश्न , महिलांचे तसेच बचत गटात काम करणाऱ्या होतकरू महिलांचे प्रश्न , तरुणांचा बेरोजगारीचा प्रश्न , कामगारांचे प्रश्न , पर्यटनाचे प्रश्न , शैक्षणिक क्षेत्रातील प्रश्न , रेल्वेचे प्रश्न , शेतकऱ्यांचे प्रश्न , शहर सुधारतेचे प्रश्न , वाहतुकीचे प्रश्न असे विविध प्रश्न सोडविण्यात अपयशी ठरलेले येथील खासदारांनी आजपर्यंत कुठलेच ठोस काम केले नसल्याचा व कुठलाच निधी आजपर्यंत न वापरल्याचा या प्रमुख समस्यांवर प्रकाश टाकत आरोप देखील त्यांनी केला.


तुम्ही सर्व आज ” शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे ” या पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे व येथील ठोस नेतृत्व शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख नितीन दादा सावंत यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिलात , येथील काम खूप चांगले आहे , याचे कौतुक देखील त्यांनी करत या तुमच्या पाठिंब्याने लोकसभेच्या निवडणुकीत मावळ – पिंपरी – चिंचवड – कर्जत खालापूर – पनवेल – उरण या विधानसभा मतदार संघातून महाविकास आघाडीतील घटक पक्षाच्या जोरावर चार लाखांचे मताधिक्य घेवून आपण निवडून येवू , असा आत्मविश्वास देखील त्यांनी बोलून दाखविला . यावेळी अनेकांचा तसेच भाजपाचे कृष्णा जाधव यांचा आपल्या समर्थकांसह शिवसेनेत पक्षप्रवेश झाला . तर अनेकांची नियुक्ती करण्यात आली , यावेळी अनेक प्रमुख मान्यवरांनी आपले मार्गदर्शन केले.

- Advertisment -

You cannot copy content of this page