Saturday, November 2, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईशिशुविहार माध्यमिक विद्यामंदिरशिशुविहार गिल्ड एक अनोखा प्रकल्प..

शिशुविहार माध्यमिक विद्यामंदिरशिशुविहार गिल्ड एक अनोखा प्रकल्प..

मुंबई – ( श्रावणी कामत ) शिशुविहार माध्यमिक विद्यामंदिर
शिशुविहार गिल्ड एक अनोखा प्रकल्प शैक्षणिक वर्ष 2024/24 मधे शिशुविहार माध्यमिक शाळेत एक अनोखा प्रकल्प राबविण्यात आला. गिनीज वर्ल्ड बुक मधे शाळेचे स्काऊट गाईड चे 15 विद्यार्थी व शिशुविहार गिल्ड चे अध्यक्ष व सभासद सहभागी झाले.त्यांनी 115 क्रोशा स्कार्फ बनवून एम.आय. सी. क्यू. या संस्थेने बनवलेल्या 4500 स्कार्फ मधे भागीदारी करून गिनीज वर्ल्ड बुक रेकॉर्ड सर्टिफिकेट चे मानकरी ठरले . 5 वेळा गिनीज बुक वर्ल्ड रेकॉर्ड करणार्‍यां मा.सुबश्री नटराजन यांच्या हस्ते या विद्यार्थ्यांना हे सर्टिफिकेट देण्यात आले.


विद्यार्थ्यांनी बनवलेले हे स्कार्फ लोक.टिळक रुग्णालयातील कॅन्सर पेशंट ना वाटण्यात आले..या वेळी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिशुविहार गिल्ड च्या सभासद व शिशुविहार माध्यमिक च्या शिक्षिका श्रीम वैशाली यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री.शिंदे सर यांनी केले. या पूर्ण उपक्रमास शिशुविहार माध्यमिक शाळेच्या माजी मुख्याध्यापिका व शिशुविहार गिल्ड च्या माजी अध्यक्षा श्रीम दक्षा चित्रोडा यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. तसेच शिशुविहार मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी या उपक्रमास पाठिंबा दिला.

- Advertisment -

You cannot copy content of this page