Thursday, June 1, 2023
Homeमहाराष्ट्ररायगडशेतकरी आंदोलनाला पाठींबा देत खालापूर काँग्रेसने केला भाजपा सरकारचा निषेध..

शेतकरी आंदोलनाला पाठींबा देत खालापूर काँग्रेसने केला भाजपा सरकारचा निषेध..

खालापूर (दत्तात्रय शेडगे)
भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी, प्रदेश अध्यक्ष नाना पटोले व जिल्हा अध्यक्ष महेंद्र घरत यांच्या आदेशानुसार वाढत्या महागाई, डीजेल – पेट्रोल दर वाढ, तीन शेतकरी विरोधी काळे कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी व शेतकरी आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी खोपोली शहर काँग्रेससह खालापूर तालुक्याच्या वतीने 27 सप्टेंबर खोपोली शिळफाटा येथील छत्रपती शिवाजी महाराज स्मारका समोर काँग्रेस तर्फे आंदोलन करीत भाजपा सरकारचा निषेध व्यक्त करीत भाजपा सरकार व पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.

असून यावेळी काँग्रेसच्या वतीने खालापूरचे तहसिलदार आयुब तांबोळीना निवेदन देण्यात आले. केंद्र सरकारने वाढवलेल्या घरगुती गँस, पेट्रोल, डिझेल महागाई विरोधात खालापूर तालुका व खोपोली शहर काँग्रेस कार्यकर्त्यांनी खोपोली शिळफाटा आवारात 27 सप्टेंबर रोजी केंद्र सरकार विरोधात निदर्शने करीत केंद्र सरकार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात जोरदार घोषणा देण्यात आल्या असून देशातील शेतकरी व जनतेला भूलथापा देऊन सत्तेवर आलेल्या केंद्र सरकारने दरवाढ मागे घ्यावी.

अशी मागणी आंदोलकांनी केली. यावेळी शहर अध्यक्ष रिचर्ड जॉन यांनी आपल्या विचार व्यक्त करताना म्हणाले की देशातील जनतेला अच्छे दिनाचे स्वप्न दाखवून केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने सर्वसामान्य जनतेचा विश्वासघात केला असून नुकताच तीन शेतकरी विरोधी काळे कायदा लागू केला असून ते कायदे रद्द करण्यासाठी काँग्रेस संपूर्ण देशात आंदोलन केले असता खालापूर काँग्रेस व खोपोली काँग्रेसच्या वतीने भाजपा सरकारचा जाहिर निषेध करण्यात येत आहे.

येत्या काळात भाजपा सरकारने हे कायदे रद्द व महागाई कमी न केल्यास काँग्रेसच्या वतीने पक्षश्रेष्ठी जो निर्णय देतील त्या आदेशाचे पालन करित तीव्र आंदोलन छेडण्यात येईल तर पेट्रोलच्या दराने केव्हाच शंभरी पार केली असून डिझेल याचबरोबर घरगुती गँस, तेलाचे भाव गगनाला भिडल्याने या महागाईने सर्वसामान्याचे आर्थिक बजेट कोलमडल्याचे पाहायला मिळत असताना कोरोनाच्या सद्यपरिस्थितीत गेल्या दोन वर्षापासून सर्वसामान्य नागरिक दरवाढीने भरडला गेला आहे.

बेरोजगार, शेतकऱ्यांना याचा मोठ्या फटका बसला आहे. येत्या काही दिवसात आणखी किती दरवाढ होणार यांचा अंदाज बांधणे कठीण होत असल्याने केंद्र सरकारच्या मनमानी कारभाराचा अनेक जण निषेध व्यक्त करीत असताना खालापूर तालुका काँग्रेस व खोपोली शहर काँग्रेसच्या वतीने केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला असून केंद्र सरकार विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.

याप्रसंगी खोपोली शहर काँग्रेसअध्यक्ष रिचर्ड जॉन, युवक अध्यक्ष अँड.संदेश धावारे, तालुका अध्यक्ष नाना म्हात्रे, जेष्ठ नेते कृष्णा पारांगे, सरचिटणीस रायगड जिल्हा काँग्रेस अशोक मुंढे, शिळफाटा विभाग अध्यक्ष मेहमुद शेख, हायदर फक्की, प्रविण वेदक, जलील कुरेशी, ईरफान शेख, सागर सुखदरे, कुणाल जाधव, श्याम विनेरकर आदीप्रमुखासह मोठ्या कॉग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

You cannot copy content of this page