Monday, July 22, 2024
Homeपुणेलोणावळाशौकत भाई शेख यांच्या सहकार्याने अनिकेत गुप्ता यांना मोफत उपचार..

शौकत भाई शेख यांच्या सहकार्याने अनिकेत गुप्ता यांना मोफत उपचार..

लोणावळा : नेताजीवाडी खंडाळ्यातील २३ वर्षीय अनिकेत गुप्ता यांचा बाईक अपघात झाला, ज्यामुळे त्यांचा डावा पाय फ्रॅक्चर झाला. या उपचारांसाठी सुमारे एक लाख रुपयांची आवश्यकता होती.
भाजप आमदार नितेश साहेब राणे व स्वाभिमान मेडिकल हेड जाईद भाई खान यांच्या मार्गदर्शनाखाली भाजप अल्पसंख्याक अध्यक्ष मवाळ, शौकत भाई शेख यांनी पुढाकार घेतला आणि अनिकेत गुप्ता यांचे ऑपरेशन सुमय्या हॉस्पिटल सायन, मुंबई येथे यशस्वीपणे आणि मोफत करण्यात आले.
शौकत भाई शेख यांनी यापूर्वीही अनेक गरजू लोकांना मोफत सर्जरीसाठी मदत केली आहे. गरजू रुग्णांसाठी, ज्यांच्याकडे उपचारासाठी पैसे नसतात, तेव्हा शौकत भाई शेख स्वाभिमानी संघटनेच्या माध्यमातून आवश्यक ती मदत पुरवतात.
अनिकेत अशोक गुप्ता यांनी शौकत भाई शेख यांच्या या मदतीबद्दल कृतज्ञता व्यक्त करत आभार मानले.
- Advertisment -

You cannot copy content of this page