if(isset($image4)); {?>
} ?>
if(isset($image5)); {?>
} ?>
लोणावळा (प्रतिनिधी): संत ज्ञानेश्वर माऊली संजीवन समाधी दर्शनार्थ कोकण ते आळंदी निघालेल्या प्रत्येक दिंडी चे लोणावळा, गवळीवाडा येथील श्रीराम मंदीरात स्वागत करण्यात आले.
आलेल्या सर्व पायी दिंडीमधील वारकऱ्यांसाठी श्रीराम मारुती सेवाभावी ट्रस्ट व समस्त गवळीवाडा ग्रामस्थ आणि अखिल भारतीय वारकरी संप्रदाय राजस्थानचे प्रदेशाध्यक्ष व ए. वन. चिक्कीचे मालक ह. भ. प. श्री. रमेशशेठ देविशंकर व्यास यांच्या वतीने यथोचित सन्मान व सेवा करण्यात आली. सर्व वारकऱ्यांसाठी चहा, नाश्ता, जेवण आणि मुक्कामाचे आयोजन करण्यात आले.
त्याचबरोबर वारकऱ्यांना थंडी पासून संरक्षणासाठी ऊबदार शालिचे वाटप करून लोणावळ्याचे माजी उपनगराध्यक्ष व श्रीराम सेवाभावी ट्रस्टचे माजी अध्यक्ष कै. दत्तात्रय कोंडीबा गवळी यांच्या स्मरणार्थ प्रत्येक दिंडी चालकास त्यांच्या स्मृतिपित्यर्थ स्मृतिचिन्ह वाटप करण्यात आले.
यावेळी श्रीराम मारूती सेवाभावी ट्रस्टचे अध्यक्ष दिलीप लोंढे व सर्व विश्वस्त अनिल गवळी, मोहन औरंगे, राजू गवळी, प्रकाश रगडे, मनोज मोगरे, नितीन अगरवाल, यतिन अकोलकर, मा. उपनगराध्यक्ष सुधिर शिर्के, काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस निखिल कविश्वर, श्रीराम क्रीडा मंडळ अध्यक्ष महादेव गवळी, सुनिल मोगरे, ए.वन् चिक्की चे व्यवस्थापक मोहब्बतसिंह व सर्व स्टाफ, संजय गवळी, राजू भि. गवळी, मनोज गवळी, भरत खंडेलवाल, संदीप लोंढे, प्रशांत गवळी, चंद्रकांत गवळी, बाळू गायकवाड, गोविंद खंडेलवाल, मनेष गवळी, मनिष गवळी, मंगेश बालगुडे, सुर्यंकांत औरंगे,मा. उपनगराध्यक्षा सिंधुताई कविश्वर, श्रीमती शकुंतला दत्तात्रय गवळी, मंगल लोंढे, निलम कडू, मा. उपनगराध्यक्षा सुवर्णा अकोलकर, शुभांगी व्यापारी, सौ. सविता शिर्के, हर्षदा मोरे, मेघना गवळी, कमलाआक्का गवळी आदींसह,श्रीराम मारूती सेवाभावी ट्रस्टचे सलग्न सर्व संस्था व ग्रामस्थांकडून सेवा देण्यात आली.