Friday, June 9, 2023
Homeपुणेलोणावळाश्री दत्त जयंती निमित्त कालेकर मळा येथे मिरवणूकीला पंढरी वारीचे स्वरूप…

श्री दत्त जयंती निमित्त कालेकर मळा येथे मिरवणूकीला पंढरी वारीचे स्वरूप…

लोणावळा (प्रतिनिधी):श्री दत्त जयंती निमित्त नवनाथ मित्र मंडळ कालेकर मळा, स्वराज्य नगर व डेनकर कॉलनी परिसराच्या वतीने विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
नवनाथ मित्र मंडळाच्या वतीने सालाबाद प्रमाणे यंदाही श्री दत्त जयंती उत्सव विविध धार्मिक कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला.श्री दत्त जयंतीचे औचित्य साधून भजन मृदूंगमणी कार्यक्रम, काकड आरती, हरिपाठ,श्रींचा अभिषेक,दुपारी श्रींची पालखीतून भव्य मिरवणूक दिंडी व सायंकाळी श्री दत्त जन्म सोहळा, श्रीं ची आरती आणि रात्री भंडारा महाप्रसादाचे आयोजन करत सामुदायिक चक्री भजन तसेच नवमी भजनी मंडळाच्या साथ संगतीत हरिपाठ व होम हवन करण्यात आले.
यावेळी आयोजित श्री च्या पालखी मिरवणूक सोहळ्यात परिसरातील नागरिकांनी, महिला व लहान तरुणांनी प्रचंड सहभाग नोंदविला. टाळ व मृदूंग वाणीने पारंपरिक खेळ खेळत ही मिरवणूक संपन्न झाली. मिरवणूकीचे मुख्य आकर्षण म्हणजे या पालखी सोहळ्याला वारकरी दिंडीचे स्वरूप आले होते. तर टाळ मृदूंग वाणीने संपूर्ण परिसर दुमदुमून गेल्याचे चित्र निर्माण झाले होते.अगदी उत्साही वातावरणात श्री दत्त जयंतीचा सोहळा पार पडला.

You cannot copy content of this page