Tuesday, May 30, 2023
Homeपुणेलोणावळाश्री भैरवनाथ देवस्थान ट्रस्ट गावठाण उत्सव कमिटी च्या अध्यक्षपदी अमोल(आण्णा) ओंबळे यांची...

श्री भैरवनाथ देवस्थान ट्रस्ट गावठाण उत्सव कमिटी च्या अध्यक्षपदी अमोल(आण्णा) ओंबळे यांची निवड…

लोणावळा(प्रतिनिधी): श्री भैरवनाथ देवस्थान गावठाण, लोणावळा उत्सव कमिटी 2023-2024 च्या अध्यक्षपदी अमोल (आण्णा ) ओंबळे यांची निवड करण्यात आली.
लोणावळा शहराचे ग्रामदैवत श्री भैरवनाथ देवतेचा उत्सव सालाबाद प्रमाणे बुधवार दि.15 मार्च रोजी साजरा होत आहे. त्या निमीत्ताने बुधवार दि.8 मार्च ते शुक्रवार दि.17 मार्च पर्यंत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन कमिटी कडून करण्यात आले आहे.
त्यानुसार नऊ दिवस चालणारे कार्यक्रमाचे खालीलप्रमाणे आयोजन करण्यात आले आहे.
यावेळी पुजनीय आदरणीय संतमहात्मांच्या पवित्र आशिर्वादाने अखंड हरिनाम, विणापुजन, काकड आरती, जगद्गुरू संत तुकाराम महाराज संगित गाथा पारायण, हरिपाठ, भगवत कथा आयोजीत केली आहे. तरी सर्व लोणावळेकर नागरिक, देणगीदार, मावळ पंचक्रोशीतील भाविक भक्त, वारकरी, किर्तनकार, प्रवचनकार, भजनी मंडळ, मृदुंगाचार्य, गायनाचार्य, तसेच सामाजिक राजकीय व पत्रकार मंडळी यांनी सदर कार्यक्रमास उपस्थित राहावे अशी नम्र विनंती उत्सव कमिटी अध्यक्ष अमोल ओंबळे यांनी केले आहे.
श्री भैरवनाथ देवस्थान उत्सव समिती 2023-2024 ची कार्यकारिणी पुढील प्रमाणे आहे.अध्यक्षपदी अमोल वि. ओंबळे,उपाध्यक्ष प्रकाश म. हारपुडे (पो. पाटील), खजिनदार अमित प्र. गवळी (मा. नगराध्यक्ष, लोनपा), सहखजिनदार संजय कि. हारपुडे पाटील,सेक्रेटरी राजेश तु. तिकोणे पाटील, सहसेक्रेटरी भगवान पां.पांगारे पाटील,व सहसेक्रेटरी खंडू वि. कंधारे अशी कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे.

You cannot copy content of this page